Ganeshotsav 2020 | आंबोलीत 7 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा निर्णय
आंबोलीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील एक महिना लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग : तळकोकणातील मुख्य पर्यटन असलेल्या आंबोलीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Amboli Lockdown For Month) पुढील एक महिना लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे (Amboli Lockdown For Month).
गोव्यात ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबोली घाटमार्गाचा उपयोग केला जातो. आंबोलीत बाहेरुन येणारे लोक बाजारपेठत थांबतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेता आंबोली ग्रामपंचायत आणि कोरोना नियंत्रण गाव समितीने आंबोलीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे 7 सप्टेंबरपर्यंत आंबोली गावात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, बाजार पेठा पूर्णपणे बंद राहणार असून गावाबाहेरील व्यक्तींनाही गावात येण्यास पूर्णतः मज्जाव करण्यात आला आहे. तसा ठराव देखील घेण्यात आला आहे. या निर्णयाचे आंबोली वासीयांनी स्वागत केले आहे.
कोरोनाचं संकट, मग कोकणात इतके लोक का पाठवताय? थेट इंडियन मेडिकल असो.चा आक्षेपhttps://t.co/GC2GSGczvu#Kokan #Ganeshotsav #IMA #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2020
Amboli Lockdown For Month
संबंधित बातम्या :
Konkan Ganeshotsav | कोकणात 12 ऑगस्टपर्यंत पोहोचणं आवश्यक, परिवहन मंत्र्यांनी सर्व नियम सांगितले