कोकणच्या आंब्याने अमेरिकेला लावलं वेड; लासलगाव मार्गे थेट अमेरिकेत आंबा जाणार; टिकण्यासाठी विशेष प्रक्रिया

फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या आंब्याने अमेरिकेलाही वेड लावले आहे. यंदाच्या वर्षीही लासलगाव मार्गे कोकणचा आंबा परदेशात जाणार आहे.

कोकणच्या आंब्याने अमेरिकेला लावलं वेड; लासलगाव मार्गे थेट अमेरिकेत आंबा जाणार; टिकण्यासाठी विशेष प्रक्रिया
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 12:58 PM

लासलगाव, नाशिक : फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत सुरु झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस ,केशर, बदाम या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन आंबे 20 हजार पेटीतून 75 टन आंबे अमेरिकेला रवाना झाले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणार्‍या भारतातील महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ येथील हापूस आंब्याची अमेरिकेतील नागरिकांना भारतीय आंब्याची भुरळ पडल्याने आंब्याची मागणी वाढली आहे. दर्जेदार द्राक्ष आणि कांदा निर्यातीत पुढाकार घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आता आंब्याच्या निर्यात केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे.

फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण युरोपियन महासंघाने भारतातून आयात होणार्‍या हापूस आंब्यावर 2013 साली बंदी घातली होती. त्यामुळे फाळांचा राजा असलेल्या हापूसचे आता काय होणार? ही चिंता होती.

पण आता ही चिंता कायम स्वरूपी मिटली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दिशेने कूच करू लागला आहेत .

हे सुद्धा वाचा

4 एप्रिल ते 30 जून या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या अँग्रो सर्च या कंपनीच्या वतीने विकिरण प्रक्रिया केली जाणार आहे. लासलगाव येथे 31 ऑक्टोंबर 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता.

मात्र, येथे आता मसाले आणि आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत पाठविले जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींच्या आंब्याचा समावेश आहे.

लासलगाव येथून आंब्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून हा हापूस सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, हय़ूस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमध्ये पाठविला जातो. हळूहळू या मागणीत वाढ होत आहे.

यंदाच्या हंगामातील 75 मेट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून हा आंबा व्यापऱ्यांकडून अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. मागील वर्षी 350 मेट्रिक टन आंबा परदेशात पाठविण्याकरिता लासलगाव येथे विकिरण प्रकियेसाठी आला होता. यावर्षी त्यात दीडशे टणाने वाढ होण्याची शक्यता आहे.

विकिरण प्रक्रिया म्हणजे?  लासलगावच्या केंदात गॅमा किरणांचा 400 ते 700 ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निमिर्तीची प्रक्रिया ही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद आणि ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.