हे एक नंबर चे पलटी मास्टर… रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेची खोचक टीका

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बारसू रिफायनरीच्या संदर्भात असलेली भूमिका आणि शरद पवार यांच्या राजीनामाच्या संदर्भात झालेल्या घडामोडीवर जहरी टीका केली आहे.

हे एक नंबर चे पलटी मास्टर... रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेची खोचक टीका
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 12:21 PM

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जहरी टीका केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी दिलेले पत्र आणि आत्ताचा सुरू असलेला विरोध यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना पलटी मास्टर म्हंटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार होत असल्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्षपदीच राहणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यानं एकपात्री प्रयोग असल्याचं मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिवचण्यात आले आहे.

याच दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सकाळी एक दुःखद घटना घडल्याची माहिती दिली आहे. त्यामध्ये एका मनसैनिकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आणि इतर किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले आहे. तर रत्नागिरीच्या मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी केल्याचीही माहिती देशपांडे यांनी दिली आहे.

कोकणात उत्साही वातावरण आहे. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर असून बारसू रिफायनरीच्या प्रकल्पाच्या संदर्भात ग्रामस्थांची भेट घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. शिवसेनेचा इतिहास बघितला तर काही वेगळं होत नाही.

हे सुद्धा वाचा

हे एक नंबर चे पलटी मास्टर आहे. जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा लोकांशी का चर्चा केली नाही. किंवा काही सेटलमेंट झाली नसेल म्हणून आंदोलन करायचं म्हणजे काही मलिदा मिळाला तर मिळाला अशी जहरी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

तर दुसरीकडे राजन साळवी यांची यात गोची झाली आहे. तुम्ही पलटी मारू शकता पण लोक नाही मारू शकत नाही असेही देशपांडे यांनी म्हंटलं आहे. खरंतर काही नागरिकांचा विरोध आहे तर काहींचे समर्थन आहे. त्यावरून देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

याच दरम्यान काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून घडामोडी सुरू होत्या त्यावरही मनसेने भाष्य केले आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात चाललेला हा एकपात्री प्रयोग आहे. राजीनामा तुम्हीच देणार, मागे पण तुम्हीच घेणार.

महाराष्ट्राची 78 तास चांगली करमणूक झाली. काय चाललंय हे महाराष्ट्राला लवकर कळेल असा संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. तर रत्नागिरीत होत असलेल्या राज ठाकरे यांच्या सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून त्याबाबत संदीप देशपांडे यांनी आढावा घेतला आहे.

एकूणच आज कोकणातील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि भाजप सेनेचा मोर्चा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतच सभा आहे. त्यामध्ये कोण काय बोलणार याकडे संपूर्ण कोकण वासीयांचे लक्ष लागून आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.