नाद खुळा! भंगारातील दुचाकीला बनवलं सुपर बाईक, तरुणाच्या हटके संकल्पनेची चर्चा तर होणारच…

भंगारमधून अवघ्या दोन हजार रुपयांना एक दुचाकी घेतली, तिच्यावर सहा हजार रुपये खर्च करत भन्नाट सोलर बाईक तयार केली असून सध्या कोपरगावमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

नाद खुळा! भंगारातील दुचाकीला बनवलं सुपर बाईक, तरुणाच्या हटके संकल्पनेची चर्चा तर होणारच...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 10:01 AM

कोपरगाव ( अहमदनगर ) : काही तरुण शिक्षण घेत असतांना त्यांच्यामध्ये असलेल्या कल्पकतेला सत्यात उतरवत असतात. आणि त्याचा काही वेळेला चांगलाच करिश्मा पाहायला मिळत असतो. असाच एक करिश्मा कोपरगाव येथील तरुणाच्या हातून घडला आहे. यामध्ये या तरुणाने भंगारमधील दुचाकीपासून सोलर बाईक तयार केली आहे. अवघ्या आठ हजार रुपयांचा खर्च करून कोळपेवाडीच्या नितीन देशमुख ची सोलर बाईक पाहण्यासाठी सध्या गर्दी होऊ लागली आहे. तरुणाने घडविलेला हा अविष्कार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे शेतकरी वर्गातून या प्रयोगाचे जोरदार कौतुक होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात राहणा-या तरूणाने भंगारात पडलेल्या दुचाकीला चक्क सोलर पॅनल बसवून नवा अविष्कार घडवलाय. अवघ्या आठ हजार रुपयांत तयार केलेल्या सोलर बाईकची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम इन्स्टिट्यूटमध्ये DEE च्या अंतीम वर्षाचे शिक्षण घेणा-या नितीन देशमुख या शेतक-याच्या मुलाने चक्क सोलर बाईक बनवली असून तिचे कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा

भंगारातून अवघ्या अठराशे रूपयांना घेतलेल्या इलेक्ट्रीक बाईकला त्याने सहा हजार रूपये खर्च करून सोलर बाईक बनवली आहे. आता त्याला विज आणि इंधनाच्या खर्चा शिवाय सर्व कामे करता येत आहेत. शेती कामात मोठी मदत होत आहे.

गाई गुरांना चारा आणणे असो की डेअरीत दुध घालणं. सर्वकाही या सोलर बाईकवर तो करताना दिसत आहे. रस्त्याने चालताना त्याची हि गाडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. इंजिनचा आवाज नाही आणि इंधनाचा खर्चही नाही. केवळ सूर्यप्रकाश हेच या गाडीचे इंधन आहे.

उन्हात कसल्याही इंधना शिवाय तो दिवसभर मोठया दिमाखात फिरत असतो. त्याच्या या अविष्कारामुळे वडीलही आनंदी झाले आहेत. लवकरच तो त्याचे हे आगळे-वेगळे पर्यावरण पूरक पेटंट जगासमोर मांडणार आहे. धडपड्या, खटपट्या, उचापत्या करणारा तरुण म्हणून त्याची मित्रांमध्ये ओळख आहे.

नितीन देशमुख याला भविष्यात आणखी मोठे संशोधन करायचे आहे. शेतकाऱ्याचा लेकरू असल्याने मार्गदर्शनाची आणि आर्थिक आधाराची गरज आहे. म्हणजेच काय त्याच्या पंखाना बळ देण्याची गरज आहे. सध्या नितीन देशमुखची सोलर बाइक कोपरगावात चर्चेचा विषय ठरत आहे.

कोपरगावमध्ये खरंतर विविध स्वरूपाच्या वाहनांची अनोख्या पद्धतीने बनवून विक्री करण्याची एक खास पद्धत आहे. अनेक लोकं आपली दुचाकी खास पद्धतीने बनविण्यासाठी कोपरगावला जातात. अशातच एक सोलर बाईकची निर्मिती करण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.