मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठा, पोस्टर फाडणाऱ्यांना सोडणार नाही; क्षीरसागर यांचा इंगवले यांना गर्भित इशारा
दरम्यान कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या पोस्टरमधील क्षीरसागर यांचा फोटो फाडल्याची घडना समोर आली आहे. ज्यामुळे आता क्षीरसागर यांनी पोस्टर फाडणाऱ्या गर्भित इशारा दिला आहे. तसेच मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे. पोस्टर पडणाऱ्यांना सोडणार नाही असे म्हटलं आहे.
कोल्हापूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली नाराजी व्यक्त करत बंडखोरी केली. तसेच या बंडखोरीत त्यांनी शिवसेनेच्या अर्ध्याहून अधिक आमदारांना आपल्या सोबत करून घेतले. त्यामुळे शिवसेनेचा हायजॅक झाल्याचे चित्र राज्यात पहायला मिळत आहे. यादरम्यान शिंदे यांच्या गटाला कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे देखील जाऊन मिळाले. त्यामुळे कोल्हापूर शहरात असणाऱ्या शिवसैनिकांना एकच धक्का बसला. तर बंडखोर शिंदेसह फुटलेल्या त्या आमदारांविरोधात कोल्हापूरात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आता कोल्हापूरमधील शिवसेनेत (Shiv Sena) ही क्षीरसागर प्रणित शिंदे गट आणि ठाकरे यांची शिवसेना असे पहायला मिळत आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या पोस्टरमधील क्षीरसागर यांचा फोटो फाडल्याची घडना समोर आली आहे. ज्यामुळे आता क्षीरसागर यांनी पोस्टर फाडणाऱ्या गर्भित इशारा दिला आहे. तसेच मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे. पोस्टर पडणाऱ्यांना सोडणार नाही असे म्हटलं आहे.
क्षीरसागर यांचे पोस्टर फाडण्यात आले
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात शिवसेनेतच गट निर्माण झाले आहेत. तर शिंदे यांनी आपल्या बरोबर आधीच काही आमदार आणि शिवसेनेचे पदाधिकारी जोडले होते. ते सर्व आमदार आणि पदाधिकारी शिंदे यांच्या बंडानंतर फुटले आहेत. तसेच ते सर्व आता गुवाहाटी येथे शिंदे यांच्याबरोबर आहेत. याच दरम्यान शिंदेसह फुटलेल्या आमदारांविरोधात राज्यात शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात येत आहेत. तर त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी करत आहेत. तर स्थानिकपातळीवर फुटलेल्या नेत्यांचे फोटोंना काळे फासले जात आहे. तर कोल्हापूरमध्येही असाच प्रकार समोर आला असून क्षीरसागर यांचे पोस्टर फाडण्यात आले आहे.
पोस्टर पडणाऱ्यांना सोडणार नाही
राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने रविकिरण इंगवले आक्रमक झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या पोस्टरमध्ये क्षीरसागर यांचा असणारा फोटो फाडला. ज्यामुळे कोल्हापूरमध्ये क्षीरसागर यांना मानणारे आणि शिवसैनिक एकमेकांच्या समोर आले आहेत. त्यावेळी पोस्टर फाडल्यावर क्षीरसागर यांनी आक्रामक पवित्रा घेत पोस्टर फाडणाऱ्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे. पोस्टर पडणाऱ्यांना सोडणार नाही. हा इशारा त्यांनी इंगवले यांना दिला आहे. तसेच ते म्हणाले, मी सुशिक्षित गुंड आहे. मी बाहेर पडलो तर पळता भुई थोडी करेन. तर वैयक्तिक द्वेषातून पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना पाठीशी घालू नका असे आवाहन क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांना केले आहे.