Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, अजितदादांनी सांगितला नवा आकडा

लाडक्या बहिण योजनेवरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या योजनेबद्दल दिशाभूल केली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, अजितदादांनी सांगितला नवा आकडा
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 6:33 PM

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचार सुरू झाला असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सध्या लाडकी बहीण ही योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी असून, सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली आहे, ही योजना नंतर बंद होईल असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही, विरोधकांकडून दिशाभूल सुरू असल्याचं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून दिलं जात आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला, ते सांगवीमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

या योजनेसाठी लागणाऱ्या खर्चासाठी आम्ही पुढचे पाच वर्ष तरतुद केलेली आहे. ही योजना सुरूच राहणार आहे. विरोधकांकडून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. आम्ही आतापर्यंत दोन कोटी तीस लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे. थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. एखाद्याच्या घरी मनी ऑर्डर येते, तेव्हा ती मनी ऑर्डर घेऊन पोस्टमन येतो. त्यालाही अपेक्षा असते की आता यांना पैसे मिळाले आहेत, ते आपण दिले म्हणून आपल्यालाही बक्षीस मिळेल. ज्याने मनी ऑर्डर घेतली त्याला त्या पोस्टमनला काही तरी बक्षीस द्याव लागायचं. मात्र आपण या योजनेत कोणी मध्यस्थ ठेवलाच नाही. आपण थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा करत आहोत.  या योजनेसाठी पुढील पाच वर्ष तरतुद केली आहे. योजना पुढे चालू ठेवायची असेल तर घड्याळाला मतदान करा असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान पुढे ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जर अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर आपला मागचा अर्थसंकल्प हा साडेसहा लाख कोटींचा होता, पुढचा अर्थसंकल्प हा सात लाख कोटींचा असेल त्यातील 45 हजार कोटी रुपये हे लाडक्या बहिणींसाठी असतील तर पंधरा हजार कोटी रुपये हे माझ्या शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करण्यासाठी असतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.