Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण होणार लखपती, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, ‘आता दर महिन्याला…’

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, कुर्ल्यात शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण होणार लखपती, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, 'आता दर महिन्याला...'
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 8:37 PM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, कुर्ल्यात शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. कुर्ल्यामध्ये महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकरांचा विजय निश्चित असून, विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं तसेच लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते कुर्ल्यात आयोजित प्रचारसभेमध्ये बोलत होते. कुर्ल्यामध्ये महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकरांचा विजय निश्चित असून, विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. ही पहिली प्रचार सभा आहे आणि त्याचा मान आपल्या कुर्ला मतदार संघाला मिळाला आहे. कुडाळकर ओपनिग बॅट्समॅन झाले आहेत, आणि आता बाकी लोकांना क्लीन बोल्ड करत डिपॉझिट जप्त झाले पाहिजे, फटाके फुटत आहेत , काही ठिकाणी लऊंगी आहेत.  मात्र आपला ॲटम बॉम्ब फुटेल असा हल्लाबोल यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे असंही म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो, आता तुम्हाला वर्षाला नहीं तर महिन्याला भाऊबीज मिळणार आहे. विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद होईल, आम्ही महिलांना विकत घेतलं असं म्हणतात. या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना लाडकी बहीण जोडा दाखवणार आहे. ते मुंबई हायकोर्टात गेले, पण हायकोर्टानं त्यांना लाफा मारला. विरोधक म्हणतात आमचं सरकार आलं की या योजनेची चौकशी करून योजना बंद करणार, तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये टाकलेलं तुम्हाला चालेल का? असा सवाल करतानाच योजना सुरू करणे जर गुन्हा असेल तर असे दहा गुन्हे मी करेल असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी खटा खट म्हणाले होते व्होट घेतले , मात्र आता पैसे नाही म्हणतात.  हिमाचलमध्ये योजना सुरू करून बंद केली, राजस्थानमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत.  आम्ही फेस टू फेस काम करणारे लोक आहोत, फेसबुक लाईव्ह करणारे लोक नाहीत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.