Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? …तर मिळणार नाहीत पैसे

लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आता या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? ...तर मिळणार नाहीत पैसे
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 4:20 PM

अंतरीम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. विधानसभा निवडणुकीमध्ये देखील लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचं पहायला मिळालं.

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली तर तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती, दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं. दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच डिसेंबरचा हफता कधी मिळणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे.

डिसेंबरच्या हफत्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे, आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हफत्याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र आता त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते, परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते, काही महिलांना एक -दोन महिन्यांचेच पैसे मिळाले, अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत, अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तसेच 2100 रुपयांचा हफ्ता देखील या वर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे, पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये ऐवजी 2100 रुपये जमा होऊ शकतात. ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.