एक चूक घडली… लाडकी बहीण समोर आली, पैसे परत केले, त्यानंतर पुन्हा… धुळ्यात लाडकी बहीण योजनेत मोठा ट्विस्ट

धुळे जिल्ह्यातील एका महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे चुकून तिच्या मुलाच्या खात्यात आल्यानंतर स्वतःहून परत केले. महिलने चुकून मुलाचे आधार कार्ड दिल्याने पैसे तिच्या मुलाच्या खात्यात आले होते. ही चूक लक्षात आल्यावर तिने प्रशासनाला स्वतःहून कळवून पैसे परत केले आणि नंतर पुन्हा योग्य पद्धतीने अर्ज करून योजनाचा लाभ घेतला.

एक चूक घडली... लाडकी बहीण समोर आली, पैसे परत केले, त्यानंतर पुन्हा... धुळ्यात लाडकी बहीण योजनेत मोठा ट्विस्ट
धुळ्यात लाडकी बहीण योजनेत मोठा ट्विस्ट
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 2:42 PM

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार सत्तेत आलं आणि त्यांची प्रचंड गाजलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना पुन्हा चर्चेत आली. पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, विविध अर्जांची फेरपडताळणी करण्यात आली. तेव्हाच या योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्यांचे एक प्रकरण धुळे जिल्ह्यात घडल्याचे समोर आले होते. तेथील नकाने गावातील एका महिलेने शासनाचे निकष डावलून या सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्या महिलेचे 7500 रुपये परत घेण्यात आले होते, अशी बातमीही सर्वत्र झळकली होती.

मात्र आता याप्रकरणात एक नवा ट्विस्ट आला असून वेगळीच माहिती समोर आली आहे. शासनाने आपल्याकडू न पैसे परत घेतलेले नाही तर आम्हीच चुकीचे कागदपत्र दिल्याने आम्हाला पैसे मिळाले आणि ती चूक झाल्याचे आमच्याच लक्षात आले. त्यामुळे आम्ही स्वत:हून ते पैसे परत केल्याचे त्या महिलेने सांगितलं आहे. प्रशासनाकडूनही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे त्या महिलेने स्वत:हून पुढे येत या योजनेचे पैसे परत केल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर ते पैसे परत केल्यानंतर त्या महिलेने पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता आणि त्या पात्र ठरल्यानंतर त्यांना आत्तापर्यंत 4500 हजार रुपये देखील मिळाले आहेत, अशी माहितीही त्या महिलेच्या मुलाने दिली आहे.

ती एक चूक घडली, पण समोर येऊन केले पैसे परत

मिळालेल्या माहितीनुसार, भिकूबाई खैरनार असे त्या महिलेचे नाव असून त्या धुळे जिल्ह्यातील नकाने येथील रहिवासी आहेत. त्यांनी लाडकी बहीण योजनेचा दुबार लाभ घेतला आणि ते उघड झाल्यावर शासनाने त्यांचे पैसे परत घेतले, अशा बातम्या सकाळापासून फिरत होत्या. मात्र त्यानंतर भिकूबाई खैरनार आणि त्यांचा मुलगा स्वत: पुढे आले आणि हे सगळं खरं नसल्याचं सांगत, नेमकं काय घडलं हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. भिकू बाई यांनी चुकून त्यांच्या मुलाचे आधार कार्ड दिल्याने, त्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये पैसे आले होते त्यामुळे शासनाने टाकलेल्या साडेसात हजार रुपये हे त्यांच्या मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले होते. त्यांचा मुलगा पोस्टमन आहे. मुलाच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आल्याचं लक्षात आल्यानंतर भिकुबाई यांनी प्रशासनाकडे हे पैसे परत कारण्यासाठी अर्ज केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर, या महिलेकडनं साडेसात हजार रुपये परत घेत शासनाकडे जमा केले आहेत.

भिकूबाई यांचा मुलगा योगित याने याबद्दल माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे, संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी’ आम्ही जेव्हा आईचा फॉर्म भरला तेव्हा त्या फॉर्मसह चुकून माझं आधार कार्ड दिलं गेलं. फॉर्म सबमिट केल्यानंतर सर्वांचे पैसे आले, तेव्हा आम्ही आईचे पैसे आलेत का हे चेक करत होतो, तेव्हा ते पैसे तिच्या अकाऊंटवर तिच्या नावाने दिसले नाहीत, मात्र या योजनेचे पैसे माझ्या नावाने खात्यात जमा झाले, हे आमच्या लक्षात आलं. फॉर्मवर नाव आईचं पण कागदपत्रांमध्ये आधार कार्ड मात्र माझं दिलं गेलं, हे आमच्या लक्षात आलं.

आमची चूक झाल्याचं समजताचं आम्ही सदर कलेक्टर ऑफीसला तसेच बालविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. आणि त्यानंतर आमच्या खात्यात आलेले पैसे आम्ही स्वत:हून जमा केले, प्रशासनाने आमच्याकडून ते पैसे मागितले नाही, असे योगित खैरनार यांनी स्पष्ट केलं. नंतरचेही सर्व हप्ते ( पैसे) आम्ही तिथे जमा केले. अपात्र ठरल्याने सरकारने आमच्याकडून ते पैसे वगैरे घेतले, असं काहीही झालं नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं. हे पैसे खात्यात आले तेव्हाच आम्हाला कळलं की चूक झाली, ते पैसे घेऊन आम्ही चूक करतोय असंच आम्हाला वाटलं.आईला पैसे मिळावेत म्हणून आम्ही योजनेसाठी अर्ज केला होत, पण ते माझ्या खात्यात पैसे आले, जे चुकीचं होतं, ते पैसे घेणं मला बरोबर वाटलं नाही, म्हणूनच आम्ही पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना हे प्रकरण सांगितलं आणि प्रामाणिकपणे ते पैसेही परत केले. यापुढे तो अर्ज क्रमांक देखील बंद झाला आहे, असे योगित यांनी स्पष्ट केलं.

नंतर पुन्हा केला अर्ज

हे सगळं झाल्यानंतर आम्ही माझ्या आईसाठी पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आणि आधार कार्डही तिचेच दिले. त्यामुळे ती योजनेसाठी पात्र ठरली आणि आम्हाला पहिले 3 हजार नंतर 1500 असे आत्तापर्यंत एकूण 4500 रुपये अशी रक्कम खात्यात आलेली आहे, असे खैरनार यांनी नमूद केलं.

बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.