पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस, उमेदवारांची दमछाक, 1 डिसेंबरला मतदान

राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मंगळवारी मतदार होणार आहे. त्यामुळे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार जोरदार प्रचार करताना पाहायला मिळतील.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस, उमेदवारांची दमछाक, 1 डिसेंबरला मतदान
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 9:33 AM

मुंबई: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांसाठी आजचा रविवार म्हणजे सुपर संडेच म्हणावा लागेल. त्यामुळे आज सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची दमछाक होणार आहे. नागपूर, पुणे आणि औरंगाबाद पदवीधर, तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहे. 1 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे.(last day of the graduate and teacher constituency election campaign)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सतिश चव्हाण यांची ही सलग तिसरी निवडणूक आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपवासी झाल्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही.

नागपूर पदवीधर मतदारसंघ

दुसरीकडे नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपने विद्यमान आमदारांना डावलून महापौर संदीप जोशी यांना मैदानात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडूनही नव्या दमाच्या अभिजीत वंजारी यांना संधी देण्यात आली आहे.

नागपूर पदवीधरसाठी वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांचं मतदान

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत वयोवृद्ध आणि दिव्यांग मिळून 154 मतदारांनी आतापर्यंत मतदान केलं आहे. 80 वर्षावरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या घरी प्रशासन पोहोचत आहे. निवडणूक कर्मचारी आतापर्यंत 218 घरी पोहोचले आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या एकूण 14 पथकं शहरात तर 3 पथकं ग्रामीण भागातील वयोवृद्ध मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. हे मतदान सीलबंद लिफाफ्यात बंद करुन जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलं जात आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे संग्राम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, मनसेच्या रुपाली पाटील आणि जनता दल सेक्यूलरचे शरद पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. महत्वाची बाब म्हणजे संग्राम देशमुख, अरुण लाड आणि शरद पाटील हे तिनही उमेदवार सांगलीचे आहेत. त्यामुळे सांगलीतील मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होईल. अशास्थितीत पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य पुण्यावर अवलंबून असणार आहे. तर कोल्हापूर, सोलापूर आणि साताऱ्यातील मतदारांचा कौलही निर्णायक ठरु शकतो.

दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार आणि काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्यात लढत होत आहे. दत्तात्रय सावंत आणि जितेंद्र पवार हे सोलापूरचे आहेत, तर आसगावकर कोल्हापूरचे. दरम्यान जो उमेदवार पुण्यातून सर्वाधित मतं घेणार तो उमेदवार विजयी ठरण्याची शक्यता अधिक आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे पदवीधरसाठी एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदार मतदार आहेत. तर शिक्षक मतदारसंघात 72 हजार 545 मतदार आहेत.

अमरावती शिक्षक मतदारसंघ

अमरावती शिक्षक मतदारसंघात वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपकडून नितीन धांडे निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान भाजप नेते अनिल बोंडे यांच्या बहीण संगिता शिंदेही मैदानात असल्याने भाजप उमेदवारासमोरिल डोकेदुखी वाढली आहे.

संबंधित बातम्या:

पदवीधर निवडणुकीच्या मेळाव्यात नेत्यांचा उदंड उत्साह, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पदवीधर निवडणूक जिंकली म्हणजे लगेच भाजपचं राज्य येणार नाही, रावसाहेब दानवेंचं टेबलावर बसून भाषण

महाविकासआघाडीने पुण्यात आजोबांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलीय; मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरेंची टीका

last day of the graduate and teacher constituency election campaign

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.