Live Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबईः महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या शिवसेना (Shivsena) पक्ष आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी आज निवडणूक आयोगासमोर होणार आहे. यासंबंधीच्या प्रत्येक घडामोडींविषयी अपडे्स इथे जाणून घेऊयात. तसेच महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या दावोस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित आहेत. पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी 45,900कोटींची गुंतवणूक मिळाल्याची माहिती हाती आली आहे. या आणि दिवसभरातील इतर महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहू.
LIVE NEWS & UPDATES
-
भिवंडीत युरियाचा साठा जप्त
पोलिसांच्या कारवाईत सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त
औद्योगिक वापरातील की कृषी वापरातील हे प्रयोगशाळेतील चाचणीनंतर स्पष्ट होणार
तूर्तास नारपोली पोलिसांनी संशयित युरिया घेतला ताब्यात
प्रयोगशाळेतील चाचणीनंतर गुन्हा दाखल होणार
-
एसीपीकडून महिलेची छेडछाड
औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील आक्रमक
एसीपी विशाल डुमेला निलंबित न केल्यास शुक्रवारी करणार औरंगाबाद बंद
बुधवारपर्यंत विशाल डुमे याला निलंबित करा
अन्यथा शुक्रवारी औरंगाबाद बंद
इम्तियाज जलील यांनी घेतली पीडित महिलेची भेट
-
-
नवी मुंबईत गाड्यांचे पार्ट चोरीला
तळोजात एकाच रात्रीत 20 ते 25 गाड्यांचे पार्ट चोरले
नवी मुंबईतील अनेक ठिकाणी पार्ट चोरीच्या घटनांमध्ये वाढ
अनेक टुरिस्ट गाड्यांचे पार्ट काढून चोरले
इमारतीच्या समोरून गाडीचे पार्ट काढले
तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
वसईत अविनाश जाधव आक्रमक, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर भडकले
वसई :
पक्षाचे झेंडे काढल्यामुळे मनसे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका सहाय्यक आयुक्तांना धरले धारेवर
वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती एचचे सहाय्यक आयुक्त गिल्सन घोणलासविस यांना जाब विचारताना अविनाश जाधव यांनी अश्लील भाषेचाही केला वापर
मनसेच्या शाखा ओपनिंगसाठी वसई पश्चिम अंबाडी रोडवरील पालिकेच्या खांब्यावर अनधिकृत पक्षाचे झेंडे लावल्याने पालिकेने आज दुपारी ही कारवाही केली होती
कार्यक्रमा अगोदरच झेंडे काढल्याने संतापलेल्या अविनाश जाधव यांनी शहरातील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करत नाहीत. पण पक्षाचे झेंडे का काढता? असा जाबही सहाय्यक आयुक्तांना विचारला
-
मुंबई : घातक रसायनांचा साठा जप्त
डोंबिवलीतून १० लाख रुपये किंमतीचा घातक रसायनांचा साठा जप्त
तिलकनगर पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई
कारवाईत टँकर चालकासह स्थानिक केमिकल माफिया पोलिसांच्या ताब्यात
गणेश सोनवणे व मुशरब खान असे या आरोपींची नावे
अटक झालेल्या आरोपी पैकी एक आरोपीला कोरोनाची लागण
-
-
मालेगाव शहरात इन्कम टॅक्सचे छापे
शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अलफैज नावाच्या कत्तल करणार्या कंपनीवर छापा
मालेगावातील अजूनही काही कत्तल कारखाने आयकरच्या रडारवर
कंपनीचे गेट बंद करून हा ताफा आत जात राहतो
मालेगावसह पुणे, मुंबई, भिवंडी, सोलापूर सह राज्यभरात कारवाई सुरू
अनेक कत्तल कारखाने आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती
-
घटनेत मुख्यनेता हे पदच नाही, अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया
घटनेत मुख्यनेता हे पदच नाही, शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक होते त्यातून पक्षाध्यक्षाची निवड होते, अशी घटना वाचून दाखवण्यात आली. आता पुढची सुनावणी शुक्रवारी होईल, अशी पहिली प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.
-
सुनावणीनंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांची पहिली प्रतिक्रिया
डॉक्युमेंट्सवर ऑब्जेक्शन नाही. मी जेव्हा बोललो तेव्हा मी पूर्ण प्रतिक्रिया दिली होती. कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया घ्या, अशी प्रतिक्रिया महेश जेठमलानी यांनी दिली.
-
सुनावणीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
सुनावणी पूर्ण होऊ द्या. पक्षातून काही आमदार निघून गेले आहेत. पक्ष जागेवरतीच आहे. आम्ही सगळे पक्षात आहोत, संजय राऊत यांची प्रतिक्रिया
-
शिंदे गटाचे सर्व मुद्दे खोडले, अनिल देसाई यांची पहिली प्रतिक्रिया
आमचे वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीवेळी समोरच्या वकिलांनी ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या कशा चुकीच्या होत्या, ते स्पष्ट केलं. अगदी घटना पासून ते वेगवेगळ्या दावांना खोडण्यात आलं. दोन गटात संघटना विभागली गेली त्याचा बेस काय, याबाबत मुद्देसूदपणे माहिती मांडण्यात आली. त्याची नोंद आयोगाकडून घेतली गेली. संघटनात्मक निवडणुकीच्या स्थितीबद्दल आज चर्चा झाली नाही. गेल्या सुनावणीवेळी त्यांनी जे मुद्दे मांडले ते कसे चुकीचे होते याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं.आपल्याच पक्षाची घटना घेऊन तुम्ही युक्तीवाद करता, एककीकडे घटना मान्य करायची आणि नंतर घटनाच नाही असा युक्तीवाद करायचा असा युक्तीवाद झाला. देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाची ही सुनावणी होणार आहे. लोकशाही सुदृढ व्हावी यासाठी ही सुनावणी महत्त्वाची आहे. त्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. त्या गोष्टी समोर येत आहेत, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.
-
कपिल सिब्बल यांनी अजून दोन-अडीच तासांची वेळ मागितली आहे : राहुल शेवाळे
कपिल सिब्बल यांनी अजून दोन-अडीच तासांची वेळ मागितली आहे, युक्तिवादासाठी वेळ लागेल, असं सांगितलं. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलली, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली.
-
कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया
कपिल सिब्बल काय म्हणाले?
होणार काय? कायद्यात फक्त युक्तिवाद होतो. महेश जेठमलानी मोठे वकील आहेत ते काहीही करु शकतात. त्यांना विचारा
-
धनुष्यबाणाची सुनावणी आता 20 जानेवारीला
सुनावणी पाच दिवस पुढे ढकलली, पुढची सुनावणी 20 जानेवारीला होणार
-
कपिल सिब्बल यांचा पुन्हा युक्तिवाद सुरु
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा पुन्हा युक्तिवाद सुरु
पक्षाच्या घटनेला आवाहन देता येत नाही, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद :
निवडून आलेले आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेत
त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि पक्ष वेगवेगळा
कागदपत्रे खरी ठरी असतील तर ओळख परेड करा
तातडीने निर्णय देऊ नका, कोर्टाच्या निकालाची प्रतिक्षा करा
पक्षात होता तेव्हा पक्षाच्या घटनेवर आक्षेप का घेतला नाही?
पक्षाचा लाभ घेतला आणि परत लोकशाही नाही म्हणता
आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही. म्हणजे आमची पक्षाची घटना कायदेशीर आहे आमदार आणि खासदार हे पक्षाच्या नुसार निवडून येतात. पक्षाच्या धोरणांना मानून मतदार मतदान करतात
पक्षाची घटना ही योग्यच आहे. तिला आव्हान देता येऊ शकत नाही
आतापर्यंत उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत होते, मग आताच आक्षेप का?
पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मुदतवाढ द्या
-
ठाकरे गटाचा युक्तीवाद चुकीचा आहे, ठाकरे गटाच्या वकिलांचा दावा
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी नाहीत. ठाकरे गटाचा युक्तीवाद चुकीचा आहे, जेठमलानी यांचा युक्तिवाद
-
आदिक अली प्रकरणाचा शिंदे गटाच्या वकिलांकडून दाखला
आधीच्या निकालांच्या शिंदे गटाच्या वकिलांकडून दाखला दिला जातोय
आदिक अली प्रकरणाचा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून दाखल दिला जातोय
बहुमत चिन्हासाठी बहुमत आवश्यक, शिंदे गटाकडे बहुमत आहे, जेठमलानी यांचा युक्तिवाद
-
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु :
पक्षातून एखादा मोठा गट लोकप्रतिनिधींसह बाहेर पडला तर त्यात बेकायदेशीर काय? महेश जेठमालांनी यांचा युक्तिवाद
आमच्याकडे संख्याबळ जास्त
संख्याबळ जास्त असल्याने चिन्हाचा लवकर निर्णय घ्यावा, जेठमलानी यांची मागणी
आम्ही कागदपत्रे सादर केले आहेत. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, जेठमलानी यांचा युक्तीवाद
ठाकरे गटाचे पदाधिकारी होते त्याचपद्धतीने शिंदे गटाचे पदाधिकारी नेमले गेले होते. त्यामध्ये कोणतीही चूक नाही. मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी बाहेर पडत आहेत, यामध्ये तथ्य आहे.
आधीच्या निकालांच्या शिंदे गटाच्या वकिलांकडून दाखला दिला जातोय
आदिक अली प्रकरणाचा जेठमलानी यांच्याकडून दाखल दिला जातोय
-
निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्यात, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद :
निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्यात
सर्व कागदपत्रांची छाननी करावी
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला
पाहा सुनावणीचे लाईव्ह अपडेट :
-
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी, कपिल सिब्बल यांचा दावा
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद :
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत कोणताही निर्णय घेऊ धका कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा कोर्टाचा निर्णय आधी येऊ द्या शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याची कपिल सिब्बल यांचा दावा
शिंदे गटाची अनेक प्रतिज्ञापत्र बोगस
चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नका, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत वाट पाहावी, अशी विनंती
काही लोकांना घेऊन पक्षातून बाहेर पडणं बेकायदेशीर आहे
-
सर्वात मोठी बातमी, आज निकाल येण्याची शक्यता कमी
धनुष्यबाणाच्या सुनावणीवर आज अंतिम निकाल येण्याची शक्यता फार कमी, सूत्रांची माहिती
आज दोन्ही बाजूचे वकिल युक्तीवाद करणार, नंतर निकाल
या आठवड्यात अंतिम निकाल येऊ शकतो, पण आज अंतिम निकाल येणार नाही, सूत्रांची माहिती
-
शिवसेनेतील फूट काल्पनिक, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू :
शिवसेनेतील फूट कपोकल्पित आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट झालेली नाही. जे आमदार बाहेर पडले आहेत ते त्यांच्या इच्छेने बाहेर पडले आहेत. पक्षातून बाहेर पडले ते वेगळ्या गटाचे आहेत. शिंदे गट हा शिवसेना नाही.
शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. ही फूट ग्राह्य धरु नये. ती काल्पनिक असू शकते.
कपिल सिब्बल यांनी पक्षाची घटना वाचायला सुरुवात केली.
-
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू
कपिल सिब्बल यांच्याकडून कागदपत्रे आयोगासमोर ठेवण्यात आले
-
सुनावणीच्या कामकाजाला सुरुवात, लवकरच युक्तीवादाला होणार सुरुवात
नवी दिल्ली :
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे कपिल सिब्बल केंद्रीय निवडणूक आयोगात उपस्थित निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी, आयुक्त आणि दोन्ही गटाचे 20 पेक्षा जास्त वकील आयोगात दाखल ठाकरे गटाकडून अनिल देसाई, अनिल परब हे नेते उपस्थित तर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे सुनावणीला हजर
अद्याप युक्तीवाद सुरु झालेला नाही
-
केंद्रीय निवडणूक आयोगात दोन्ही गटाचे एकूण 25 वकील
नवी दिल्ली :
केंद्रीय निवडणूक आयोगात दोन्ही गटाचे एकूण 25 वकील
एवढ्या वकिलांची फौज सुनावणीसाठी उपस्थित असणार
शिंदे गटाकडून महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांची टीम
-
केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनावणीला सुरुवात, ठाकरे गटाच्या वकिलांचा महत्त्वाचा युक्तीवाद
नवी दिल्ली :
केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनावणीला सुरुवात ठाकरे गटाकडून सुरुवातीला युक्तीवाद केला जाणार वकिलांकडून शिवसेनेशी संबंधित कागदपत्रे सादर केले जाणार पक्षाची नेमकी घटना काय, याविषयी माहिती दिली जाणार
-
केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात
नवी दिल्ली :
केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात झाली
शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर अखेरचा निर्णय येण्याची शक्यता
-
Pune Live- -पुण्यात नायलॉन मांजावर घातलेले बंदीचे आदेश धुडकावून संक्रातीला पतंगबाजी करण्यात आल्याचे उघडकीस आले आह.
पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार दोन पोलीस जखमी झाल्याची घटना घडली.
पोलीस कर्मचारी महेश पवार आणि सुनील गवळी अशी जखमी झालेल्यांची नावे आहे.
पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत
-
भुवनेश्वरमध्ये CBI ची छापेमारी, निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याकडून 17 किलो सोने जप्त
भुवनेश्वरमध्ये CBI ची छापेमारी, निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याकडून 17 किलो सोने जप्त
17 किलो सोन्याच्या दागिन्यांची किंमत जवळपास 8 कोटी रुपये
सीबीआयकडून मालमत्तेची कागदपत्रेही जप्त
प्रमोद कुमार जैना असं निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याचं नाव
-
Entertainment live : तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेद हिचं खळबळजनक ट्विट
उर्फी हिचं नवीन ट्विट चर्चेत; आत्महत्येबद्दल म्हणाली, ‘आयुष्य खूप लहान…’
आत्महत्येसंदर्भात ट्विट केल्यामुळे मॉडेल तुफान चर्चेत… वाचा सविस्तर
-
Entertainment live : जगातील सर्वात सुंदर महिलेचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन
अभिनेत्री ते जर्नलिस्ट क्षेत्रामध्ये होतं या महिलेचं वर्चस्व
निधनामुळे कवाविश्वाला मोठा धक्का… वाचा सविस्तर
-
Cricket Live: न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे सीरिजमध्ये श्रेयसची अय्यरची जागा घेणार रजत पाटीदार
पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधून बाहेर
श्रेयसच्या जागी रजत पाटीदारचं दिलं नाव; बीसीआयची माहिती
-
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा उदयनराजेंच्या हस्ते सन्मान
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा उदयनराजेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मागच्या आठवड्यात त्याने महेंद्र गायकवाडचा पराभव करुन महराष्ट्र केसरीची गदा मिळवली.
-
Team India: टीम इंडियात स्थान न मिळाल्याने बॅट्समनच्या डोळ्यात अश्रू, हॉटेलमधल्या भेटीत काय सांगितलेलं?
Team India: टीम निवडताना एका बॅट्समनला त्याच्या निवडीची भरपूर अपेक्षा होती. टीममध्ये स्थान मिळेल, असं त्याला वाटलं होतं. पण त्याच्या पदरी निराशा आली. वाचा सविस्तर….
-
IND vs NZ, 1st ODI, LIVE Streaming: जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता IND vs NZ सामना
IND vs NZ, 1st ODI, LIVE Streaming: वनडे सीरीजची सुरुवात 18 जानेवारी बुधवारपासून होणार आहे. पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला जाईल. वाचा सविस्तर….
-
Team India Party: टीम इंडियाची RRR च्या सुपरस्टारसोबत पार्टी, रोहित-विराटने पार्टीकडे फिरवली पाठ
Team India Party: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये उद्यापासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. या महत्त्वाच्या मॅचआधी टीम इंडियाचे खेळाडू एका पार्टीत रमले होते. वाचा सविस्तर…
-
Babar Azam: टीममधल्या दुसऱ्या प्लेयरच्या गर्लफ्रेंडसोबत सेक्सटिंगचा आरोप, बाबर आजमची पहिली Reaction
Babar Azam: पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजम संकटात सापडलाय. त्याचे पर्सनल फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झालेत. या आरोपांवर बाबर आजमने मौन सोडलय. वाचा सविस्तर….
-
Bollywood Live: ‘मारेकऱ्याला हिरो बनवलं जातंय’; ‘गांधी गोडसे’ चित्रपटावर भडकले महात्मा गांधींचे पुतणे
दिग्दर्शक राजकुमार संतोषींच्या ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटावर महात्मा गांधींचे पुतणे तुषार गांधींची प्रतिक्रिया
त्यांच्यासाठी गोडसे हा हिरो आहे आणि जर ते त्याला हिरोसारखं दाखवत असतील तर त्याचं कोणालाच आश्चर्य वाटू नये- तुषार गांधी
ज्या चित्रपटामागे मारेकऱ्याचा गौरव करण्याचा हेतू असेल, तर असा चित्रपट मी पाहू इच्छित नाही- तुषार गांधी
हा चित्रपट येत्या 26 जानेवारी रोजी होणार प्रदर्शित, वाचा सविस्तर
-
Live- बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भावनिक नात्यावर भाष्य करणारे मराठी नाते लवकरच रंगभूमीवर
मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर आधारित नाटकाचा प्रयोग
बाळासाहेबांचा राज या मराठी व्यावसायिक नाटकाचा लवकरच शुभारंभाचा प्रयोग
23 जानेवारी बाळासाहेबांच्या जन्मदिनी होणार नाटकाचा शुभारंभ
-
थोड्याच वेळात धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी
धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला गेल्यास ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार
नव्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार
शिवसेना नेत्यांची ज्येष्ठ वकिलांशी चर्चा – सूत्रांची माहिती
निवडणूक आयोगाने आज निर्णय दिल्यास तात्काळ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार
-
Bollywood Live: शाहरुख खानच्या ‘पठाण’बाबत दिल्ली हायकोर्टाचे आदेश; चित्रपटात करावे लागणार बदल
यशराज फिल्म्स प्रॉडक्शनला ‘पठाण’मध्ये काही बदल करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे निर्देश
चित्रपटात सबटायटल, क्जोज कॅप्शनिंग आणि हिंदीत ऑडिओ डिस्क्रिप्शन देण्याचे आदेश
ओटीटी प्लॅटफॉर्मवर श्रवण आणि दृष्टिबाधित लोकांना चित्रपटाचा आनंद घेता यावा यासाठी करावे लागणार बदल
कोर्टाकडून निर्मात्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत सर्व तपशील सादर करण्याचे निर्देश, वाचा सविस्तर..
-
Robin uthappa: दुबईत उथाप्पाच्या बॅटचा तडाखा, DC कडून मैदानात उतरलेल्या रॉबिनने 12 चेंडूत ठोकल्या 52 धावा, VIDEO
सध्या दुबईत T20 लीग सुरु आहे. या टुर्नामेंटमध्ये रॉबिथ उथाप्पाची बॅट चांगलीच तळपतेय. तो खोऱ्याने धावा करतोय. मागच्यावर्षी रॉबिन उथाप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. वाचा सविस्तर…..
-
IND vs NZ: 3 प्रमुख खेळाडू नसूनही न्यूझीलंडकडे मजबूत संघ, टीम इंडियाला देऊ शकतात धक्का
IND vs NZ: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आता 18 जानेवारीपासून 3 वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. पहिल्यांदाच न्यूझीलंडची टीम आपल्या 3 महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय खेळणार आहे. वाचा सविस्तर…
-
Team India: टीम इंडियात स्थान न मिळाल्याने बॅट्समनच्या डोळ्यात अश्रू, हॉटेलमधल्या भेटीत काय सांगितलेलं?
Team India: सिलेक्टर्सनी ‘या’ प्लेयरला फसवलं? हॉटेलमधल्या भेटीत काय बोलणं झालेलं? वाचा सविस्तर
-
दाऊद इब्राहिमच दुसर लग्न
पाकिस्तानात लपून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने तिथे दुसरं लग्न केलय. पाकिस्तानी महिलेसोबत त्याने लग्न केलय. हसीना पारकरच्या मुलाची NIA ला माहिती. वाचा सविस्तर….
-
Babar Azam चा सेक्सटिंगचा व्हिडिओ व्हायरल, हनी ट्रॅपमध्ये फसला पाकिस्तानी कॅप्टन
पाकिस्तानी टीममधील सहकारी खेळाडूच्या गर्लफ्रेंडसोबत बाबरला सेक्सटिंग करताना पकडलय. त्याचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. वाचा सविस्तर…..
-
Movie Live: अक्षय, अजयसह ‘या’ 10 स्टार्सवर भारी पडला रितेश देशमुखचा ‘वेड’
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत ‘वेड’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरू
आतापर्यंत या चित्रपटाने जमवला 47.66 कोटी रुपयांचा गल्ला
पुढील काही दिवसांत 50 कोटींचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता, वाचा सविस्तर
-
Maharashtra Politics news Live- धनुष्यबाण चिन्हबाबत आज निर्णय
ठाकरे गटाचा बी प्लॅन तयार
धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला गेल्यास ठाकरे गट दुसऱ्या चिन्हाचा निर्णय घेणार
जनतेमधून नवीन चिन्ह निवडले जाणार
शिवसैनिक आणि जनतेला चिन्हाबाबत आवाहन केलं जाणार
मशाल चिन्ह तात्पुरत असल्याने ठाकरे गट नव्या चिन्हाचा विचार करणार
आकाकज संध्याकाळी 4 वाजता चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी
-
Pune Live- पुण्याच्या प्रभाग रचनेची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत सुप्रीम कोर्टात केली होती याचीका दाखल
राज्यात सत्तांतर झाल्यावर पुणे शहराची प्रभाग रचना बदलून चार सदस्यांचा प्रभाग नवीन सरकारने केला होता
हीच प्रभाग रचना चुकीची असल्याचा दावा करत राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात केली होती याचिका दाखल
न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा पुर्ण विश्र्वास
आज कोर्टाचा निर्णय येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक जाहिर होईल
-
Live- अंधेरी गुंदवली मेट्रो स्टेशन इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू
पंतप्रधान नरेंद्र मेट्रो मार्ग क्रमांक सात आणि दोन अ चं लोकार्पण होणार…
मेट्रो स्टेशनवर पंतप्रधान यांच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी इथे मेट्रोचे केलं होतं भूमिपूजन आणि त्यांच्याच हस्ते होत आहे लोकार्पण
-
शिवसेना ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगात प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी मागितली
केंद्रीय निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी
पक्ष आणि चिन्हासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय देणार
दोन्ही गटाकडून कागदपत्रे आयोगात सादर
-
Pune Live- पीएमपीएलची डिसेंबर मध्ये रेकॉर्ड ब्रेक कमाई
डिसेंबर महिन्यात पीएमपीचे उत्पन्न 51 कोटींच्या वर
1650 बसेस ने डिसेंबर महिन्यात कमावले 51 कोटी 77 लाख रुपये
एका महिन्यात 13 लाख प्रवाशांनी पीएमपीएल ने केला प्रवास
वर्षातील सर्वाधिक उत्पन्न डिसेंबरमध्ये
-
Nashik – ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसिलदारांची नोटीस
नाशिक – ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसिलदारांची नोटीस
सिन्नरमधील जमिनीचा 22 हजारांचा कर थकवल्याप्रकरणी नोटीस
ऐश्वर्या राय बच्चनची सिन्नरच्या ठणगावजवळ आडवाडीत जमीन
आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्याची सुमारे 1 हेक्टर 22 आर जमीन
याच जमिनीच्या एका वर्षाच्या कराचे 22 हजार थकल्याने नोटीस
ऐश्वर्यासोबत इतरही 1200 मालमत्ता धारकांना नोटीस
मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई
Published On - Jan 17,2023 8:17 AM