Water Supply : लातुरकरांनो पाणी साठवणुकीची चिंता सोडा, मनपा प्रशासनाने काढला पाणीटंचाईवर तोडगा

गेल्या अनेक दिवसांपासून आठवड्यातून किमान दोन वेळा तरी पाणीपुरवठा व्हावा म्हणून प्रयत्न केले जात होते. पण ते शक्य झाले नाही. आता दोन वेळा पाणी पुरवठा कऱण्यासाठी महापालिकेने 52 किलो मिटरची नवीन पाईपलाईन टाकली आहे. एवढेच नाही तर त्यासाठी 750 ठिकाणी क्रॉस कनेक्शन करण्याची नामुष्की ओढावली आहे.

Water Supply : लातुरकरांनो पाणी साठवणुकीची चिंता सोडा, मनपा प्रशासनाने काढला पाणीटंचाईवर तोडगा
लातूर महापालिका
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 5:03 PM

लातूर : लातूर अन् पाणी टंचाई जसे काही जोडून येणारेच शब्द आहेत. बरं परस्थितीही तशीच लागून राहिलीयं की. मांजरा धरण ओव्हर फ्लो झाले काय आणि त्याने तळ गाठला काय? लातुरकरांची (Shortage of water) पाणी टंचाई ही ठरलेलीच आहे. पण आतापर्यंत जे राज्यकर्त्यांना जमले नाही ते (Administration) प्रशासनाने करुन दाखवलं आहे. सध्या मनपावर प्रशासकाची नेमणूक आहे. असे असताना आता (Latur) लातूर शहरवासीयांना आठवड्यातून दोनदा पाणी पुरवठा केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून आठ दिवसातून एकदा असाच काय तो पाणी पुरवठा. पण आता दोन वेळा पाणीपुरवठ्याला सुरवात देखील झाली आहे. त्यामुळे लातुरकरांची पाणी साठवणुकीची चिंता काही प्रमाणात का होईना मिटली आहे.

यामुळे पाणीपुरवठा झाला शक्य

गेल्या अनेक दिवसांपासून आठवड्यातून किमान दोन वेळा तरी पाणीपुरवठा व्हावा म्हणून प्रयत्न केले जात होते. पण ते शक्य झाले नाही. आता दोन वेळा पाणी पुरवठा कऱण्यासाठी महापालिकेने 52 किलो मिटरची नवीन पाईपलाईन टाकली आहे. एवढेच नाही तर त्यासाठी 750 ठिकाणी क्रॉस कनेक्शन करण्याची नामुष्की ओढावली आहे. एवढे सर्व करुन 150 पेक्षा जास्त ठिकाणी व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. महापालिकेच्या या अथक परिश्रमामुळे आता लातुरकरांना आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा सुरु झाला आहे.

मांजरा धरणातून होतो पाणीपुरवठा

लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण हे उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. या धरणावरून आंबाजोगाई, धारुर, केज, कळंब आणि लातूर शहरासह येथील एमआयाडीसीला पाणीपुरवठा केला जातो. लातूर जिल्ह्यात पाण्याचा शाश्वत स्त्रोत नसल्याने ही नामुष्की ओढावली आहे. आतापर्यंत आठवड्यातून एकदाच पाणी हे ठरलेले होते. पण मनपाच्या या प्रयोगामुळे आठवड्यातून किमान दोन वेळा पाणीपुरवठ्याला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

आता नियमित पुरवठा, लातुरकरांनी अपव्यही टाळावा

पालिका प्रशासनाने वेळ आणि अधिकचा पैसा खर्च करुन लातुरकरांना आठवड्यातून किमान दोन वेळा पाणी कसे मिळेल याचा विचार केला होता. त्यानुसार यंत्रणेत बदल करावा लागला आहे. गेल्या अनेक दिवसापासूनची मेहनत कामी आली असून आता अशाप्रकारे पुरवठा नियमित केला जाणार आहे. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करु नये असे आवाहन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.