वृद्ध महिलेची सून आणि नातवाकडून हत्या, नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न फसला

घरगुती भांडणातून वृद्ध सासू रुक्मिणीबाई माने यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. (Latur Daughter in law kills Mother in law)

वृद्ध महिलेची सून आणि नातवाकडून हत्या, नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न फसला
लातूरमध्ये महिलेची सून-नातवाकडून हत्या
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 2:23 PM

लातूर : वृद्ध सासूचा सांभाळ करताना वैतागलेल्या सुनेने आपल्या मुलाच्या मदतीने सासूची हत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या उमरगा-हाडगा या गावात घडली आहे. सासू आणि सुनेच्या नेहमी होणाऱ्या भांडणातून सासूची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. (Latur Daughter in law kills Mother in law)

सासू-सुनेमध्ये वाद

निलंगा तालुक्यातल्या हाडगा-उमरगा इथं शिवाजी माने हे आपल्या आई ,पत्नी आणि मुलासह राहत होते. त्यांची आई आणि पत्नीमध्ये नेहमी भांडणे व्हायची, मात्र त्याकडे शिवाजी दुर्लक्ष करुन आपल्या नोकरीवर जायचे. आपल्या वृद्ध आईकडेच पैसे का देता? आम्हाला का देत नाहीत, वृद्ध आईवर का खर्च करता, अशा कारणांवरुन घरात भांडणे व्हायची. याच भांडणातून वृद्ध सासू रुक्मिणीबाई माने यांची गळा आवळून हत्या करण्यात आली.

मुलाची पत्नीविरोधात तक्रार

मृत अवस्थेतच रुक्मिणीबाई यांना निलंगा येथील सरकारी दवाखान्यात आणण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याचा अहवाल दिला. या प्रकरणी मयत रुक्मिणीबाई यांचा मुलगा शिवाजी माने यांच्या फिर्यादीवरून शिवाजीची पत्नी ललिता माने (वय 55) आणि मुलगा गणेश माने (वय 24) यांच्याविरोधात पोलिसात गुन्ह्याची नोंद करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सासू-सुनेच्या भांडणात घरकर्त्या शिवाजीला अनेकदा मनस्ताप व्हायचा, घटना घडली त्या दिवशी शिवाजीच्या आईनेच त्याला डबा करून दिला होता, तो अखेरचा ठरला. या घटनेने उमरगा-हाडगा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यात ब्लाऊजने गळा आवळून सासूचा खून

दरम्यान, घरगुती वादातून सुनेने सासूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. आरोपी पूजा मिलिंद शिंदे हिचे सासू बेबी गौतम शिंदे सोबत किरकोळ घरगुती कारणांवरुन वाद सुरु होते. त्याचाच राग मनात धरुन पूजा हिने ब्लाऊजच्या सहाय्याने गळा आवळून सासूचा खून केला होता. हत्येनंतर सासूचा मृतदेह तिने पोत्यात लपवला.

सूनेकडून हत्या, मुलाने पुरावे नष्ट केले

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भरलेलं पोतं तिने आधी टेरेसवर ठेवलं होतं. त्यानंतर सोसायटीतील एका बंगल्याशेजारील प्लॉटमधील झुडपात नेऊन तिने पोतं टाकून दिलं. मृतदेह टाकून आल्यानंतर टेरेस आणि सोसायटीच्या पायऱ्यांवर पडलेलं रक्त आरोपी मुलगा मिलिंद शिंदे याने धुवून-पुसून पुरावा नष्ट केला. पूजा मिलिंद शिंदे आणि मिलिंद गौतम शिंदे असे या प्रकरणातील आरोपी सून आणि मुलाचे नाव आहे. दोघांनाही पुण्यातील तळेगांव दाभाडे पोलिसांनी अटक केली.

संबंधित बातम्या :

एकमेकांवर प्रेम जडलं, आयुष्यभर सोबतीचा निश्चय, कुटुंबियांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाचं टोकाचं पाऊल

ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

(Latur Daughter in law kills Mother in law)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.