देव जरी आला तरी मराठ्यांमुळे….; मनोज जरांगेंचं लातूरमध्ये मोठं विधान

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आज लातूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली आहे. मराठा आणि धनगर आरक्षणावर मनोज जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

देव जरी आला तरी मराठ्यांमुळे....; मनोज जरांगेंचं लातूरमध्ये मोठं विधान
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 6:24 PM

देव जरी आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही. धनगर समाजाच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की उगाच भांडण वाढवू देऊ नका. मराठ्यांच्या आरक्षणामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. धनगर समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे. जर तरीही तुम्ही आडवे येणार असाल तर बघू मग आमचा नाईलाज आहे. धनगर समाजाच्या लोकांनी आपल्या नेत्यांना सांगावं. धनगर समाजाच्या नेत्यांना माझे आवाहन आहे की तुम्ही मध्ये येऊ नका. माझे मराठा बांधवाना आवाहन आहे की जात मोठी करा. मराठ्यांवर हात उचलू नका. जात गेली तर अस्तित्व संपेल, असं मनोज जरांगे म्हणाले. जरांगे सध्या लातूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

मुंडेंवर टीका

मनोज जरांगे पाटील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून रॅलीची परवानगी नाकारली. पण काहीही झाले तरी बीडची रॅली निघणार आहे. एवढा जातीवादी पालकमंत्री आम्ही कधी पहिला नाही, असं म्हणत जरांगेंनी मुंडेंवर टीका केली आहे. सरकार आणि विरोधी पक्ष माझ्याविरोधात आहेत. सरकार आणि विरोधी पक्षाने मला उघड पडण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या तुमच्या लेकराच्या कपाळावर आरक्षणाचा गुलाल लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असंही ते म्हणालेत.

निवडणुकीतील मतदानावर भाष्य

आपल्या काही चुका या निवडणुकीत झाल्यात त्या पुन्हा होऊ देऊ नका. तुम्ही लोकसभेला एकगठ्ठा मतदान केलं. पण काही मराठ्यांनी ज्यांना मतदान करायचे नव्हतं. त्याला मतदान केलं. कारण मी संगितले होते की कोणाला द्यायचे हे सांगितले नव्हते. म्हणून 10 हजार मतं दुसऱ्याला पडलं आणि 20 हजार मतदारांनी मतदानच केले नाही, असंही जरांगे म्हणालेत.

आमच्या आंदोलनावर लाठीचार्ज केला त्या अधिकाऱ्यांना बढती दिली. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या त्या आम्हाला माहिती आहे. अधिकाऱ्यांना जातीवाद कशाला लागतो. अंबडमध्ये सभा घेतली त्या सभेत कोयत्याने हातपाय तोडायची भाषा केली तो जातीवाद नाही का? फडणवीस यांच्या सांगण्यावरून भुजबळने आमच्या समोर आंदोलनाला बसवलं. काल गावात रॅली काढली पण त्याना काय सुधरत नव्हतं. या बोळातून जा, त्या बोळातून जा असे करत होते. तिथे रॅली काढण्याचे कारण काहीतरी गोंधळ व्हावा आणि मी बदनाम व्हावा म्हणून रॅली काढली, असंही जरांगेंनी लातूरमध्ये म्हटलं आहे.

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.