Latur Crime | तब्बल आठ दिवसानंतर गणेशचा मृतदेह आढळला, हंडरगुळी गावातली घटना, अपहरणानंतर हत्या?

जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी गणेशला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे आधी अपहरण केले आणि त्यानंतर त्याचा खून केला. खुनाचा पुरावा नाहीसा करण्याच्या हेतूने गणेश दापके याचा मृतदेह पाझर तलावात नेऊन टाकला, असा आरोप पांडुरंग दापके यांनी केला आहे.

Latur Crime | तब्बल आठ दिवसानंतर गणेशचा मृतदेह आढळला, हंडरगुळी गावातली घटना, अपहरणानंतर हत्या?
मयत गणेश दापके
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 10:31 AM

लातूर: जिल्ह्यातील (Latur Crime) उदगीर तालुक्यातील हंडरगुळी (Missing case) येथील गणेश पांडुरंग दापके हा तरुण मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होता. 31 जानेवारी रोजी शेताकडे जातो म्हणून निघालेला गणेश घरी परत आलाच नव्हता. त्यानंतरपरिसरातील नागरिकांनी आणि कुटुंबियांनी त्याचा खूप शोध घेतला. अखेर वाढवणा पोलीस ठाण्यात गणेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. वाढवणा पोलीस गणेशसंबंधी काही माहिती मिळतेय का, याचा शोध मागील आठ दिवसांपासून घेत होते. अखेर सदर तरुणाचा मृतदेह हंडरगुळी पासून जवळच असलेल्या पाझर तलावात आढळून आला. दरम्यान, जुन्या भांडणातून गणेशची हत्या (Murder case) झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सहा जणांविरोधात जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशची अपहरणानंतर हत्या?

मृत गणेश पांडुरंग दापके याचे वडील पांढुरंग बाजीराव दापके यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, हा अपहरण करून हत्येचा असावा. गणेशच्या वडिलांचा आरोप आहे की, विजय शिवजाी हंगरगे, बालाजी हंगरगे, सुभाष हंगरगे, संतोष हंगरगे, त्र्यंबक घोगरे आणि आणखी एक व्यक्ती यांनी जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी गणेशला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे आधी अपहरण केले आणि त्यानंतर त्याचा खून केला. खुनाचा पुरावा नाहीसा करण्याच्या हेतूने गणेश दापके याचा मृतदेह पाझर तलावात नेऊन टाकला, असा आरोप पांडुरंग दापके यांनी केला आहे.

सहा जणांवर गुन्हा

दरम्यान, प्राथमिक चौकशीनंतर गणेशच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री उशीरा ही सर्व प्रक्रिया पार पडली. वाढवणा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी दिली.

इतर बातम्या-

Pune crime | पुण्यात सावकाराने कर्ज फेडण्यासाठी वृद्ध महिलेला मंदिराबाहेर मागायला लावली भीक ; काय आहे नेमकं प्रकरण

भांडणातून जावयाने सासूला विहिरीत फेकलं, 80 फूट खोल पडून 60 वर्षीय महिलेचा मृत्यू

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.