Latur : लातूर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं, प्रभार रचनेत काय बदलले चित्र?

प्रारुप प्रभाग रचनेमुळे सर्वकाही स्पष्ट झाले नसले तरी प्रभागाची हद्द ठरली गेली आहे. शिवाय यंदाच्या निवडणुकीचे चित्रही बदलले गेले आहे. आतापर्यंत लातूर मनपामध्ये 70 सदस्य संख्या होती. त्यामध्ये वाढ होऊन आता 81 सदस्य होणार आहेत. यामध्ये सर्वसाधरण 66, अनुसूचित जातीसाठी 14 तर अनुसूचित जमातीसाठी 1 सदस्य राहणार आहे.

Latur :  लातूर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं, प्रभार रचनेत काय बदलले चित्र?
लातूर महानगरपालिका
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 1:11 PM

लातूर :  (Latur City) लातूर शहर महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने पहिली स्टेप सोमवारी पाप पडली आहे. ( State election commission) राज्य निवडणुक आयोगाने मान्यता दिलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या अधिसूचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभागातील लोकसंख्या आणि प्रभागाची हद्द ही समजू शकल्याने आता (Election) निवडणुकीच्या अनुशंगाने एक-एक घडामोड घडू लागली आहे. पहिल्या स्टेपमधील या घटना असल्या तरी इच्छूक आणि लातुरकर मोठ्या उत्सुकतेने या प्रभाग रचनेची माहिती घेण्यात दंग असल्याचे चित्र शहरात आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार 18 वरून 27 प्रभाग करण्यात आले आहेत. तर लातुरकरांना प्रत्येक प्रभागासाठी 3 सदस्य हे निवडून द्यावे लागणार आहेत. सोमवारी दिवसभर प्रारुप प्रभाग रचनेचे काम पार पडले आहे.

मनपाच्या सदस्य संख्येतही झाली वाढ

प्रारुप प्रभाग रचनेमुळे सर्वकाही स्पष्ट झाले नसले तरी प्रभागाची हद्द ठरली गेली आहे. शिवाय यंदाच्या निवडणुकीचे चित्रही बदलले गेले आहे. आतापर्यंत लातूर मनपामध्ये 70 सदस्य संख्या होती. त्यामध्ये वाढ होऊन आता 81 सदस्य होणार आहेत. यामध्ये सर्वसाधरण 66, अनुसूचित जातीसाठी 14 तर अनुसूचित जमातीसाठी 1 सदस्य राहणार आहे. प्रभाग रचना व त्यानुसार ठरविण्यात आलेली हद्द याचे नकाशे महापालिकेच्या भींतीवर लावण्यात आले होते. त्यामुळे इच्छूक आणि लातुरकरांनी ही हद्द पाहण्यासाठी गर्दी केली होती.

शहर लोकसंख्येचे असे आहे गणित..

लातूर शहराच्या लोकसंख्येवरुन प्रभाग हे ठरविण्यात आलेले आहेत. शहराची लोकसंख्या ही 3 लाख 82 हजार 940 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जाती 64 हजार 474 तर अनुसूचित जमातीचे 5 हजार 550 अशी संख्या आहे. एका प्रभागात सरासरी 14 हजार 601 मतदार याप्रमाणे रचना करण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी 81 पैकी 14 प्रभाग हे आरक्षित राहणार आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 1 प्रभाग आरक्षित असणार आहे.

हे सुद्धा वाचा

27 जूनपर्यंत हरकत सादर करण्याची मुभा

मनपा प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना जाहिर केली आहे. त्यामुळे हद्द आणि एका प्रभाग किती मतदान हे चित्र स्पष्ट झाले आहे. ही सर्व प्रक्रिया सोमवारी पार पडली आहे. प्रत्येक प्रभागातून 3 सदस्य हे निवडून द्यावे लागणार आहेत.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.