लातूर : (Latur City) लातूर शहर महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने पहिली स्टेप सोमवारी पाप पडली आहे. ( State election commission) राज्य निवडणुक आयोगाने मान्यता दिलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या अधिसूचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभागातील लोकसंख्या आणि प्रभागाची हद्द ही समजू शकल्याने आता (Election) निवडणुकीच्या अनुशंगाने एक-एक घडामोड घडू लागली आहे. पहिल्या स्टेपमधील या घटना असल्या तरी इच्छूक आणि लातुरकर मोठ्या उत्सुकतेने या प्रभाग रचनेची माहिती घेण्यात दंग असल्याचे चित्र शहरात आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार 18 वरून 27 प्रभाग करण्यात आले आहेत. तर लातुरकरांना प्रत्येक प्रभागासाठी 3 सदस्य हे निवडून द्यावे लागणार आहेत. सोमवारी दिवसभर प्रारुप प्रभाग रचनेचे काम पार पडले आहे.
प्रारुप प्रभाग रचनेमुळे सर्वकाही स्पष्ट झाले नसले तरी प्रभागाची हद्द ठरली गेली आहे. शिवाय यंदाच्या निवडणुकीचे चित्रही बदलले गेले आहे. आतापर्यंत लातूर मनपामध्ये 70 सदस्य संख्या होती. त्यामध्ये वाढ होऊन आता 81 सदस्य होणार आहेत. यामध्ये सर्वसाधरण 66, अनुसूचित जातीसाठी 14 तर अनुसूचित जमातीसाठी 1 सदस्य राहणार आहे. प्रभाग रचना व त्यानुसार ठरविण्यात आलेली हद्द याचे नकाशे महापालिकेच्या भींतीवर लावण्यात आले होते. त्यामुळे इच्छूक आणि लातुरकरांनी ही हद्द पाहण्यासाठी गर्दी केली होती.
लातूर शहराच्या लोकसंख्येवरुन प्रभाग हे ठरविण्यात आलेले आहेत. शहराची लोकसंख्या ही 3 लाख 82 हजार 940 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जाती 64 हजार 474 तर अनुसूचित जमातीचे 5 हजार 550 अशी संख्या आहे. एका प्रभागात सरासरी 14 हजार 601 मतदार याप्रमाणे रचना करण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी 81 पैकी 14 प्रभाग हे आरक्षित राहणार आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 1 प्रभाग आरक्षित असणार आहे.
मनपा प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना जाहिर केली आहे. त्यामुळे हद्द आणि एका प्रभाग किती मतदान हे चित्र स्पष्ट झाले आहे. ही सर्व प्रक्रिया सोमवारी पार पडली आहे. प्रत्येक प्रभागातून 3 सदस्य हे निवडून द्यावे लागणार आहेत.