Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इकडे किराणा दुकानात वाईनची घाई, पण लातूरच्या या गावात तर असल्या प्रकाराला एंट्रीच नाई.. काय घेतला ठराव?

सध्या किराणा दुकानांमध्येही वाईन विक्रीला परवानगी यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरु आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यापासून विरोधकांकडून वेगवेगळ्या पध्दतीने विरोध सुरु आहे तर दारु आणि वाईनमध्ये कसा फरक आहे हे पटवून देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र, याच दरम्यान लातूर जिल्ह्यातील एका गावामध्ये दारुबंदीचा ठराव घेण्यास ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला भाग पाडले आहे.

इकडे किराणा दुकानात वाईनची घाई, पण लातूरच्या या गावात तर असल्या प्रकाराला एंट्रीच नाई.. काय घेतला ठराव?
गावात अवैध दारुविक्री बंद करण्याच्या मागणीसाठी वांजरावाडा येथील ग्रमस्थांनी मोर्चा काढला होता.
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 10:11 AM

लातूर : सध्या किराणा दुकानांमध्येही वाईन विक्रीला परवानगी यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरु आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यापासून विरोधकांकडून वेगवेगळ्या पध्दतीने विरोध सुरु आहे तर दारु आणि वाईनमध्ये कसा फरक आहे हे पटवून देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र, याच दरम्यान (Latur District) लातूर जिल्ह्यातील एका गावामध्ये (The resolution of prohibition of alcohol) दारुबंदीचा ठराव घेण्यास ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला भाग पाडले आहे. जळकोट तालुक्यातील वांजरवाडा गावात (Illegal sale of liquor) अवैधरित्या दारू विक्रीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अनेकांना दारुचे व्यसन जडले होते तर तरुणाईही व्यसनाधीन झाली होती. त्यामुळे दारूबंदीसाठी गावकऱ्यांनी ग्राम पंचायतीवर मोर्चा काढला एवढेच नाही तर गावाच्या परिसरात विकली जाणारी दारूदुकाने बंद करण्या संबंधी ग्राम पंचायतीला ठराव घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे एकीकडे किराणा दुकानात वाईनची घाई केली जात असली तरी वांजरवाडा येथील ग्रामस्थांनी इतरांना प्रेरणादायी ठरेल असा निर्णय घेतला आहे.

दारुबंदीसाठी ग्रामस्थांचा संघर्ष

जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध दारुविक्रीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अनेकांचे संसारही उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतीमध्येच दारुबंदीचा ठराव घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला एवढेच नाहीतर गाव लगतच्या भागात विकली जाणाऱ्या अवैध दारुविक्रीवरही निर्बंध आणण्यास ग्रामपंचायतीला भाग पाडले आहे. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा दारुबंदीचा ठराव घेण्यात आला आहे.

देवस्थानावरही अवैध दारुविक्रीचा परिणाम

वांजरवाडा गावात असलेल्या श्री संत गोविंद माऊली महराज यांचे मंदीर आहे. पंचक्रोशीत या देवस्थानाबद्दल आस्था आहे. त्यामुळे दर्शनासाठी कायम भाविकांची गर्दी असते मात्र, गावात जागोजागी दारुचे अड्डे असल्याने येणाऱ्या भाविकांना मद्यपींकडून त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे देवस्थानाच्या वैभवाला धोका पोहचेल या भावनेतून ग्रामस्थांनी दारुबंदीचा निर्णय घेतला आणि आता ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा ठरावच झाल्याने गावातील दारुविक्रीला आळा बसणार आहे. एकीकडे किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीसाठी ठेवण्याचा हालचाली सुरु आहेत. मात्र, वांजरवाडा येथे दारुबंदीचाच निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

CCTV | कॅशियर केबिनबाहेर जाताच संधी साधली, बँक ऑफ इंडियाच्या शाखेत टेबलवरुन 16 लाख लंपास

चंद्रपूर : जीव धोक्यात घालून वाघांचे छायाचित्र; ‘त्या’ छायाचित्रकारांवर वनविभागाकडून कारवाईचा इशारा

Nitesh Rane | दिलासा की उसासा, हे ठरण्याआधी सिंधुदुर्ग कोर्टात नेमकं 2 वकिलांमध्ये काय युक्तिवाद झाला?

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.