Latur Honey Trap : वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात खेचून लाखो रुपयांची खंडणी उकळली; ठग ‘लैला’ पोलिसांच्या ताब्यात
75 वर्षांच्या वृद्धाला विश्वासात घेऊन महिलेने त्याच्यासोबत प्रेमाचे नाटक केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पार्टी करण्यासाठी बोलावले. आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने महिलेने वृद्धाचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची आणि पोलिसांत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी लाखो रुपये उकळले.
लातूर : महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. अशातच अनेकदा खोट्या तक्रारी दाखल करून नाहक त्रास देण्याचेही प्रकार सुरू असतात. लातूर जिल्ह्यात अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना उजेडात आली. एका महिलेने चक्क एका वृद्ध नागरिकाला आपल्या जाळ्यात ओढले. त्या वृद्धाचे अश्लील फोटो (Pornographic Photos)ही तिने काढले आणि त्यानंतर त्याच फोटोंचा गैरफायदा (Misuse) उठवत वृद्धाकडून लाखो रुपयांची खंडणी (Ransom) उकळली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसही हादरून गेले असून महिलेच्या या प्रतापाने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी महिलेविरुद्व खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने अन्य दोघा आरोपींच्या साथीने वृद्धाकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. पोलीस या गुन्ह्याचा कसून तपास करीत आहेत.
वृद्ध दारुच्या नशेत असताना अश्लील फोटो काढले!
आरोपी महिलेने फिर्यादी वृद्धाला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याचे अश्लील फोटो काढत लाखो रुपयांची खंडणी उकळली. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथे घडला आहे. वृद्व नागरिक दारूच्या नशेत होता. त्यावेळी त्या वृद्ध व्यक्तीचे अश्लील फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर बलात्कराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याच धमकीच्या साहाय्याने महिलेने 15 लाख रुपयांची खंडणी उकळली. वारंवार पैसे देऊन देऊन त्रासलेल्या पिडीत वृद्ध व्यक्तीने अखेर पोलिसांत धाव घेतली. त्या वृद्धाने स्वतःच्या छळवणुकीविरुद्ध तक्रार केल्यानंतर आरोपींचा भांडाफोड झाला.
वृद्धाला आधी विश्वासात घेतले आणि प्रेमाचे नाटक केले!
75 वर्षांच्या वृद्धाला विश्वासात घेऊन महिलेने त्याच्यासोबत प्रेमाचे नाटक केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पार्टी करण्यासाठी बोलावले. आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने महिलेने वृद्धाचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची आणि पोलिसांत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी लाखो रुपये उकळले. या त्रासाला कंटाळून वृद्धाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (A ransom of lakhs of rupees was looted by dragging the old woman into the trap of love in latur)