Raosaheb Danve : बायको म्हणते सोशल मीडियात असं आलंय, मी म्हणतो गप झोप, जाऊ दे; रावसाहेब दानवे यांची तुफान फटकेबाजी, म्हणाले या दिवशी लागली सर्वात शांत झोप
माजी खासदार रावसाहेब दानवे हे त्यांच्या अस्सल ग्रामीण बाजासाठी ओळखल्या जातात. लोकसभेत जालना मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी यावर आपले मौन सोडले. राज्यात सुरु असलेल्या महाविकास आघाडीच्या आंदोलनावरही टीका केली.
माजी खासदार रावसाहेब दानवे हे त्यांच्या अस्सल ग्रामीण संवादासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणी आणि वाक्प्रचारातून शालीतून जोडे मारण्यात, चिमटा काढण्याची त्याची शैली नावाजलेली आहे. लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यावर त्यांनी मौन सौडले. मनातील शल्य त्यांनी व्यक्त केले. तर महाविकास आघाडीच्या आंदोलनावर पण तोंड सूख घेतले. लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ येथे माध्यमांशी संवाद साधताना आपल्या खास शैलीत त्यांनी तुफान फटकेबाजी केली.
विरोधकांनी राजकारण करु नये
कोणत्याही गोष्टीचं राजकारण विरोधकांनी करू नये असे आमचा आव्हान आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याप्रकरणी काँग्रेसकडून माफी मागा म्हणून आंदोलन करण्यात आलं. यावर देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माफी मागितली. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षकडून माफी मागायची काय गरज होती, असं वक्तव्य करण्यात आलं. आमच्या संस्कृतीमध्ये माफी मागायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघत नाही, विरोधकांनी या मुद्दाचे राजकारण न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नैसर्गिक वातावरणामुळे पडला पुतळा
आंदोलनाला प्रति आंदोलन काढण्यापेक्षा चांगल्या कामाला चांगलं म्हणा आणि वाईट म्हणा, आणि त्यांच्या काळातही कर्नाटक मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला गेला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला गेला. त्यांच्या काळात त्यांनी पुतळे काढले. हे तर नैसर्गिक वातावरणामुळे पुतळा पडला. आणि म्हणून त्यांच्या काळात काढलेल्या पुतळ्या संदर्भात आम्ही आंदोलन करू असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
विकासावर मतं पडतात यावर विश्वास उरला नाही
मत विकासावर पडतात यावर माझा आता विश्वास राहिला नाही, अशी सल त्यांनी बोलून दाखवली. माझ्या मतदारसंघात सहा हजार कोटींची विकास कामे केली. Dray Port सुरू केलं. जालन्यात अनेक विकास कामे केली मात्र मी पडलो. कारण मला निलंगेकर यांच्या सारखी यात्रा काढता आली नाही मला देखील अशी यात्रा काढावी लागेल. गढी ते जरंडी अशी मी त्यावेळी यात्रा काढली होती,कापसाला भाव द्या अशी मागणी प्रामुख्याने मांडली, असे ते म्हणाले.
सोशल मीडिया बघत नाही
सोशल मीडिया वापरू नका असे धस यांनी सांगितले. मी आयुष्यात कधी सोशल मीडिया बघितला नाही. कॉमेंट तर नाही. बायको म्हणते सोशल मीडियात असं आले आहे, मी म्हणतो गप झोप, जाऊ दे. मी ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवशी सर्वांत शांत झोपलो, अशी कबुली रावसाहेब दानवे यांनी दिली.
शिरुर अनंतपाळला रेल्वे येणार
शिरूर अनंतपाळ तालुक्यात रेल्वे आली पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,मीच येईन उद्घाटनाला, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यातील काही मंडळी भाजपा नेतृत्वाला टार्गेट करीत आहेत, संभाजीराव निलंगेकर यांच्या देखील मतदारसंघावर त्यांचा डाव आहे, संभाजी भैय्या यांच्या आजोबा बरोबर मी एकदा आमदार होतो,अक्का सोबत देखील खासदार होतो 45 वर्षे झाले मी राजकारणात आहे. 1971 ला इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला,आणि लोकांनी त्यांना सातत्याने मतदान केले. आम्ही काहीही केले की काँग्रेस वाले म्हणते हे असं केलं तस केलं. शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 12 हजार जमा होत आहेत. तरी देखील लोक म्हणतात आधी रोटी खायनेगे काँगेस को चुन के लायनेगे.
मोदी सरकारने 100रुपयांत गॅस दिला. 11 कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिले. सोनिया गांधीना नाहीत नव्हते मिरची कश्याला लागते,शेती ज्ञान नव्हते मग ते शेतकऱ्याचे भल कसे करतील. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरुवात केल्या आहेत. कोणतीही योजना बंद होणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला.