मृत्यूनंतर पत्नीने अवयवदान करत पूर्ण केली पतीची इच्छा! ब्रेनडेड सिंधुताईंच्या अवयवदानाने तिघांना नवं संजीवनी

Latur Organ Donation News : सिंधुताई तळवार यांच्या पतीचे सहा वर्षा पूर्वी निधन झाले होतं. त्यांचीही अवयव दानाची इच्छा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही.

मृत्यूनंतर पत्नीने अवयवदान करत पूर्ण केली पतीची इच्छा! ब्रेनडेड सिंधुताईंच्या अवयवदानाने तिघांना नवं संजीवनी
अवयवदान करणारी महिलाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 1:52 PM

लातूर : अवयवदान (Organ Donations) करण्याबाबत वेळोवेळी प्रबोधन केलं होतं. पण त्याला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प असाच असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. अशातच लातूरमधील एका महिलेच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या आदर्श निर्णयामुळे एक दोन नाही तर तिघांना नवं आयुष्य मिळालंय. एकाला नजर, तर दोघांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. ब्रेड डेड (Brain Dead women in Beed) झालेल्या मृत महिलेनं आपली किडनी, लिव्हर आणि डोळे दान केले आहे. यामुळे तिघांचं आयुष्य बदलणार आहे. मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा हा आदर्श निर्णय लातूरमधील एका महिलेच्या कुटुंबीयांनी घेतला. या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय. या निर्णयामुळे तिघा गरजूंना नवजीवन दिलंय. विशेष म्हणजे प्रशासनाकडूनही तातडीने दखल घेत ग्रीन कॉरीडोअर (Green Corridor) बनवला. अवयव दानाच्या प्रक्रियेसाठी लातूरहून मृत महिलेला रुग्णवाहिकेनं सोलापुरात आणण्यात आलं. ग्रीनकॉरीडॉरच्या मदतीने या अवयवदानाच्या प्रक्रियेला मोलाचा हातभार लागलाय.

अर्धांगवायूच्या झटक्यानं निधन

मृत्यू नंतरही लातूर शहरातल्या एका महिलेने तिघा गरजूंना नवजीवन दिलं. सिंधुताई तळवार असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने यांनी आपल्या मृत्यूनंतर अवयव दानाचा संकल्प पूर्ण केला. अर्धांगवायूचा धक्का बसल्यानंतर सिंधुताई तळवार, वय 64 यांना लातूरच्या खासगी रुग्णलयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड असल्याचं सांगितलं. ब्रेन डेड झाल्याचं कळल्यानंतर त्यांची मुले आणि नातेवाईकांनी दुःखातून स्वतःला सावरत सिंधुताई तळवार यांचे अवयवदान करण्याचं ठरवलं.

लातूरच्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून अवयव दानाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन तासाच्या आत सर्व तयारी केली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे लातूरमधून ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य झाले नाही. त्या नंतर तातडीने रुग्णवाहिकेतून सिंधुताई तळवार यांना सोलापूरला हलवण्यात आले. प्रशासनाने केलेल्या ग्रीन कॉरीडोअरने महत्त्वाची भूमिका बजावली. वाहतूक कोंडीचा फटका बसू नये, यासाठी ग्रीम कॉरीडोअरने या महिलेला सोलापुरात आणण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

पतीची इच्छा पत्नीनं पूर्ण केली

सोलापूरमध्ये मंगळवारी अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. किडनी, लिव्हर, डोळे असे अवयव गरजू रुग्णांना आता प्रत्यारोपण करण्यात येणार आहेत . त्यासाठी काल सोलापूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. सिंधुताई तळवार यांच्या पतीचे सहा वर्षा पूर्वी निधन झाले होतं. त्यांचीही अवयव दानाची इच्छा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. सिंधुताई तळवार यांना दोन मुले, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी पूर्णतः अंध आहे तर एक मुलगा मूकबधिर आहे. सिंधुताई तळवार यांच्यावर आज लातूरच्या खाडगाव समशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृत्यू नंतरही त्यांनी अवयव दानाच्या माध्यमातून तिघांना नवजीवन दिल्यानं कुटुंबीयांच्या निर्णयाचं कौतुक होतंय.

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.