लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला; नाना पटोलेंचं नाव घेत म्हणाले….

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana : लातूरमध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. या योजनेवर बोलताना फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केलीय. नाना पटोले यांचं नाव घेत त्यांनी शाब्दिक हल्लाबोल केलाय.

लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला; नाना पटोलेंचं नाव घेत म्हणाले....
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 3:35 PM

2047 ला सशक्त भारत बनवायचा असेल तर महिला केंद्रीत योजना कराव्या लागतील. तसे झाल्यावरच आपण सशक्त भारत बनवू शकतो. त्यामुळे आम्ही लखपती दिदी, लाडकी बहीण योजना, पन्नास टक्के एसटी प्रवास या योजना आणल्या. मात्र लाडकी बहीण योजना बंद कारण्यासाठी कोर्टात गेलेला व्यक्ती हा काँग्रेसचा आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांचा निवडणूक प्रचार प्रमुख आहेत हे दुर्दैव आहे. माझी विरोधकांना विनंती आहे की बिचाऱ्या महिलांच्या योजना बंद करू नका, त्याला विरोध करू नका, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लातूरमधील उदगीरमध्ये बौद्ध विहाराचं राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी हे विधान केलं आहे. नाना पटोलेंचं नाव घेत फडणवीसांनी टोला लगावला आहे.

फडणवीसांचं लातूरमध्ये भाषण

भव्य बौद्धविहाराचे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. अतिशय सुंदर आणि शांतता देणारी वास्तू उभी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुध्दांचा धम्म सर्वसामान्य लोकांमध्ये नेला. संविधानात गौतम बुध्दांचे विचार आणले आणि उत्तम संविधान निर्माण केले. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताचे संविधान बदलू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

उदगीरमधील याच कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यावर लक्षात आले की लाडकी बहीण योजना योग्य आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेसचा कार्यकर्ता कोर्टात गेला. लेक लाडकी योजनेतून 18 व्या वर्षी 1 लाख जमा होणार आहे. या योजनामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र कितीही विरोध झाला तरी योजना बंद होणार नाही. हे देणारे सरकार आहे घेणारे नाही. आता दर महिन्याला बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेची मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.