छगन भुजबळ तुला आरक्षण फुकट मिळालं…; मनोज जरांगे लातूरमध्ये नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? वाचा...

छगन भुजबळ तुला आरक्षण फुकट मिळालं...; मनोज जरांगे लातूरमध्ये नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पा़टीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 7:53 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्याचा दौरा करत आहेत. मनोज जरांगे पाटील आज लातूरमध्ये आहेत. शाहू महाराजांना अभिवादन मनोज जरांगे यांनी रॅलीची सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जरांगेंनी भाषाला सुरूवात केली. यावेळी मनोज जरांगेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांना आरक्षण आहे. त्यांना याची किंमत कळायची नाही. छगन भुजबळ तुला आरक्षण फुकट मिळालं आहे. मराठ्यांचे आरक्षण फुकट खातोय. त्यामुळं तुला त्याची किंमत कळत नाही फुकट खायला गोड वाटतं, जरा संघर्ष करून बघ. ज्याला आरक्षण आहे त्याला याची किंमत नाही कळते, असं म्हणत मनोज जरांगेंनी भुजबळांवर टीका केली आहे.

भुजबळांवर टीका

मराठे जेव्हा बिघडल्यावर कोणाला ऐकत नाहीत. छगन भुजबळ पिसळाल्या सारखं करत आहे. फडणवीस साहेबांनी तुला मंत्रिपद लय मस्तीत येऊ नको. तुला परत कांदे खायला जेलमध्ये जावे लागेल. मराठ्यांच्या नादाला लागू नको तुला परत जेलमध्ये घालवणार आहोत. ओबीसी आणि मराठ्यात कुठेही वाद होऊ द्यायचे नाही. भुजबळला दंगल घडवून आणायची आहे. भुजबळच्या मुंडक्यावर पाय देऊन सगेसोयरे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांवर टीका केलीय.

लातूरच्या भाषणात काय म्हणाले?

लातूरने सिद्ध केलंय, की राज्यात आम्ही कमी नाही. सरकारला माझी विनंती आहे. मराठा समाजाचा आक्रोश समजून घ्या. लेकरांना न्याय मिळवा म्हणून समाज एकवटला आहे. छगन भुजबळला कष्ट माहित नाही. फुकट कसे खावं हे माहितीय. भुजबळ तुला आरक्षण फुकट मिळाले आहे. मराठ्यांचे आरक्षण तू चोरून खातो… आमचं 16 टक्के आरक्षण छगन भुजबळने घेतलं आहे. छगन भुजबळ पिसाळल्यासारखे करतोय, असं मनोज जरांगे म्हणाले.

आमच्या ओरिजनल नोंदी आहेत. राज्यातील एकही ओबीसीची नोंद सरकारी नाही. आमच्या ओरिजनल नोंदी आहेत आणि त्या रद्द करा म्हणतो. एकही नोंद रद्द झाली तर 288 उमेदवार पाडले म्हणून समजा. पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलू नका लेकराच्या बाजूने बोला. पक्षातील एक नेता मोठा होईल पण आरक्षण साठी बोललात तर लेकरं मोठी होतील, असंही मनोज जरांगे म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.