प्रकाश आंबेडकरांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा; पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणामध्ये…
Pankaja Munde on Meeting With Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? पंकजा मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसंच भाजपच्या बैठकीतील मुद्द्यांवरही पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. पंकजा मुंडे काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...
भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. लातूर बीड रस्त्यावर या दोन नेत्यांची भेट झाली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेला शुभेच्छा दिल्या. यातचे फोटो पंकजा मुंडे यांनी शेअर केले आहेत. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? याचीही माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. भाजपच्या बैठकीतील मुद्द्यांवरही पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेलाही पंकजा मुंडेंनी उत्तर दिलंय. लातूरमध्ये पंकजा मुंडे माध्यमांशी बोलत होत्या.
पंकजा मुंडे- प्रकाश आंबेडकर भेटीत काय चर्चा?
आमची भेट अत्यंत योगायोगाने झाली होती. मी लातूरकडे येत होते आणि ते कदाचित बीडकडे जात होते. त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांची यात्रा सुरू आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीमध्ये आमचा सहज आणि घरगुती संवाद होता, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.राजकारणामध्ये वंचितांना, ज्यांचा आवाज कोणीच ऐकू शकत नाही. त्यांना शक्ती देण्यासाठी गोपीनाथ मुंडेसाहेब राजकारणात आले होते. मुंडेसाहेबांनी अशा लोकांना, समाजाला संधी दिली ते काम आम्ही पुढे करत राहू, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
भाजपच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा
भाजपच्या बैठकीतील मुद्द्यांवर पंकजा मुंडे बोलत्या झाल्या. नांदेड, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यातील संघटनात्मक बैठक पार पडली. मराठवाड्यातील 250 ते 300 पदाधिकारी, आमदार बैठकीत सहभागी झाल्या. अर्थसंकल्पात झालेल्या तरतुदी, बोगस मतदार नोंदणी रोखणे यावर मार्गदर्शन केलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधक टीका करत आहेत. याला पंकजा मुंडेंनी उत्तर दिलंय. लाडकी बहीण योजनेवर विरोधक टीका करत आहेत. मात्र तेच लोक त्याचा फॉर्म भरून घेण्यासाठी गडबड करत आहेत. लाडकी बहीण योजना अत्यंत चांगली असून महाराष्ट्रातील महिलांमध्ये चांगलं वातावरण आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.