Latur Crime : वृध्द शेतकऱ्याने केले नको ते धाडस, पोलीस पोहचले थेट शेताच्या बांधावर अन्….
शेती पिकामधून अधिकचे उत्पन्न मिळत नाही म्हणून गेल्या काही दिवसांपासून गांजा शेतीचे प्रमाण वाढत आहेत. मध्यंतरी बीड जिल्ह्यातील परळी आणि नगर जिल्ह्यामध्ये असे प्रकार उघडकीस आले होते. विशेष म्हणजे ऊसाच्या शेतीमध्ये गांजाची लागवड केली जात आहे. अशाच प्रकारचे धाडस औसा तालुक्यातील खुंटेफळ शिवारात एका वयोवृध्द शेतकऱ्यांने केले होते.
लातूर : (Agricultural Crops) शेती पिकामधून अधिकचे उत्पन्न मिळत नाही म्हणून गेल्या काही दिवसांपासून (Ganja Farm) गांजा शेतीचे प्रमाण वाढत आहेत. मध्यंतरी बीड जिल्ह्यातील परळी आणि नगर जिल्ह्यामध्ये असे प्रकार उघडकीस आले होते. विशेष म्हणजे ऊसाच्या शेतीमध्ये गांजाची लागवड केली जात आहे. अशाच प्रकारचे धाडस औसा तालुक्यातील खुंटेगाव शिवारात एका वयोवृध्द (Farmer) शेतकऱ्यांने केले होते. यामधून उत्पन्न हाती पडेल अशी आशा होती पण शेतकऱ्याच्या हाती थेट बेड्याच पडल्या आहेत. शेतामध्ये गांजाची झाडे लावल्याची माहिती मिळताच औसा पोलिसांनी 70 वर्षीय विठ्ठ्ल पांढरे या इसमाला अटक केली आहे. एवढेच नाही तर 1 लाख 50 हजारांचा मुद्देमालही त्याच्याकडून जप्त केला आहे.
गोठ्याला लागूनच 30 गांजाची झाडे
गांजा लागवडीला बंदी असतानाही केवळ उत्पादन वाढीसाठी शेतकरी नको ते धाडस करीत आहेत. खुंटेगाव येथील 70 वर्षीय विठ्ठ्ल पांढरे हे पारंपरिक पध्दतीने शेती करतात. मात्र, त्यांनी शेतामधील गोठ्याला लागूनच गांजाची लागवड केली होती. सलग 30 झाडे लावली होती यामधून चांगले उत्पन्न मिळेल असा त्यांना आशावाद होता. पण त्यांच्या गुपित शेतीचे बिंग फुटले आणि थेट पोलीसच शेतशिवारत आले.या दरम्यान, त्यांनी लावलेली झाडे तर नष्ट करण्यात आली पण त्यांच्याकडून पोलीसांनी 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. शिवाय 70 वर्षीय विठ्ठल आप्पाराव पांढरे यांना औसा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक शंकर पटवारी, पोलीस अधिकारी मधुकर पवार व इतर कर्मचारी यांनी केली आहे.
औसा तालुक्यात ही दुसरी कारवाई
गांजाची लागवड ही ऊसाच्या शेतामध्येच केली जाते. सध्या ऊस गाळप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे असे प्रकार समोर येत आहेत. यापूर्वी औसा तालुक्यातीलच .येळी शिवारात ऊसाच्या फडामध्ये गांजा लागवड केल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.ऊसाच्या फडात गांजा लागवड केल्याचे लक्षात येत नाही म्हणून शेतकरी आंतरपिकाप्रमाणे गांजा लागवड करीत आहेत. पण एकाच तालुक्यात ही दुसरी कारवाई झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या :
नाबार्डचा पतपुरवठा : ‘कृषी’ क्षेत्रासाठी 1 लाख 43 हजार कोटींची तरतूद, काय आहेत धोरणे?
Turmeric Crop : हळद पीक एक अन् समस्या अनेक, यंदा उत्पादन निम्म्यावरच, काय आहेत कारणे ?
लेट पण थेट : उन्हाळी सोयाबीन फुलोऱ्यात, काय आहे कृषी विभागाचा सल्ला?