काय सांगता? 16 लाखाचं सोयाबीन चोरीला, मुख्य बाजारपेठेत व्यवहारही वाढले अन् चोरीच्या घटनाही

शहरालगत असलेल्या खंडापूर शिवारातील एका गोडाऊनवर दरोडा टाकून तब्बल 16 लाख रुपयांचे सोयाबीन पळवल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलीसांनी अवघ्या 24 तासांमध्ये छडा लावलेला आहे. चोरीस गेलेल्या सोयाबीनसह याकरिता वापरण्यात आलेल्या दोन ट्रक आणि जप्त करुन 6 आरोपींनी ताब्यात घेण्यात आले आहे.

काय सांगता? 16 लाखाचं सोयाबीन चोरीला, मुख्य बाजारपेठेत व्यवहारही वाढले अन् चोरीच्या घटनाही
सोयाबीन चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी अवघ्या 24 तासांमध्ये मुसक्या आवळल्या आहेत
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 9:41 AM

लातूर : सोयाबीनची मुख्य बाजारपेठ म्हणून (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात ओळख आहे. मात्र, हंगाम सुरु होताच दरवर्षी सोयाबीन चोरीच्या घटना ह्या काही वेगळ्या नाहीत. सोयाबीनची होणारी आवक आणि वाढलेले दर यामुळे यामधून का होईना पैसा कमावण्याच्या उद्देशाने अशा घटना लातूरात यापूर्वीही घडलेल्या आहेत. शिवाय दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. शहरालगत असलेल्या खंडापूर शिवारातील एका गोडाऊनवर दरोडा टाकून तब्बल 16 लाख रुपयांचे (Soybean Theft) सोयाबीन पळवल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणाचा एमआयडीसी (Police) पोलीसांनी अवघ्या 24 तासांमध्ये छडा लावलेला आहे. चोरीस गेलेल्या सोयाबीनसह याकरिता वापरण्यात आलेल्या दोन ट्रक आणि जप्त करुन 6 आरोपींनी ताब्यात घेण्यात आले आहे.

दरवाजा उचकटून 550 पोते ट्रकमध्ये

सोयाबीनची चोरी आणि लागलीच विक्री या उद्देशाने शहराजवळील एमआयडीसी भागातल्या एका गोडाऊनचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी तब्बल 550 पोते सोयाबीन हे ट्रकमध्ये रिचलवले होते. यापैकी एक ट्रक ही नांदेड रोडवरील कृषीधन येथे तर दुसरा ट्रक हा मार्केट यार्डमधील एका आडत व्यापाऱ्याच्या दुकनाजवळ लावण्यात आला होता. शिवाय गोपीनाथ खाडप यांच्याच दुकानी सोयाबीन उतरुन घेण्यात आले होते. मात्र, रात्रीतून लखपती होण्याचे स्वप्न पोलीसांनी अवघ्या 24 तासांमध्ये धुळीस मिळवले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

असा झाला घटनेचा उलघडा

दरवर्षी सोयाबीनच्या चोरींच्या घटना ह्या ठरलेल्याच आहेत. मात्र, यंदा चोरट्यांचे धाडस वाढले असून तब्बल 550 पोते सोयाबीनची चोरी झाली असल्याने तपास करण्याचे अव्हान पोलीसांसमोर होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी 12 नंबर पाटीवरील एक संशयितास ताब्यात घेतले. नूर इसाक सय्यद यास पोलीसांनी खाक्या दाखवताच त्याने रात्री झालेला प्रकार पोलीसांना सांगितला. दोघांनी ट्रकमध्ये सोयाबीन भरण्याचे सांगितले पण हा माल चोरीचा असल्याचे माहीत नसल्याचे नूर यांनी पोलीसांना सांगितले. मात्र, त्यांच्या जबाबामुळे घटनेचा उगघडा झाला असून पोलीसांनी 6 जणांना ताब्यात घेतले असून 46 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संबंधित बातम्या :

Nanded Accident : नांदेड-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, सोमनाथ हंटेच्या शरीराचे अक्षरश: दोन तुकडे!

Vasai Crime : एकमुखी रुद्राक्ष, राजकीय व आर्थिक प्रगतीचे आमिष; 12 लाखाचा गंडा, वाचा नेमके प्रकरण काय ?

लातूरमध्ये बांबूपासून होणार इथेनॉल रिफायनरची निर्मीती, अर्थकारणाला गती देण्याासाठी 5 हजार एकरावर बांबू लागवड

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.