Vilasrao Deshmukh memorial : लातूरमध्ये दोन एकरात विलासराव देशमुखांचे स्मरणस्थळ, अपूर्ण कामामुळे उद्घाटन लांबणीवर
या परिसरात सुमारे 80 टक्के काम पूर्ण झालं. पण, काही काम बाकी असल्यामुळं पुर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन पुण्यतिथीनिमित्त होऊ शकणार नाही. विकास साखर कारखान्याच्या परिसरात हा पुर्णाकृती पुतळा उभारला जात आहे.
लातूर : लातूर जवळच्या विकास साखर कारखान्याच्या परिसरात स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे स्मरण स्थळ उभारले जाते आहे. साधारणतः दोन एकर जागेवर हे स्मरण स्थळ उभारले जाते आहे. त्यामध्ये विलासरावांचा पूर्ण आकृती पुतळा देखील आहे. या स्मरण स्थळाचे उद्घाटन उद्या त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने करण्यात येणार होते. मात्र वेळेत काम पूर्ण झाल्याने हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्मरण स्थळावरचे सिमेंट रस्ते आणि काही काम अपूर्ण आहे. गेल्या पंधरवड्यात सलग पाऊस झाल्याने इथल्या कामावर त्याचा परिणाम झाला आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या (Vilas Cooperative Sugar Factory) सभासदांना या पुतळ्याच्या अनावरणाची उत्सुकता आहे. या अगोदर मांजरा (Manjra), रेना, जागृती (Jagruti) या साखर कारखान्यांवर विलासरावांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मरण स्थळ उभारण्यात आलेले आहे.
पावसामुळं कामात अडथळा
विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ पूर्णाकृती पुतळा उभारला जातोय. त्यासाठी दोन एकर जागेचं सौंदर्याकरण करण्यात येतंय. उद्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. परंतु, गेल्या महिनाभराच्या पावसामुळं कामात व्यस्थय आला. त्यामुळं काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. विलासराव देशमुख हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं मांजरा, रेना, जागृती या साखर कारखान्यांवर विलासराव देशमुख यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे.
80 टक्के काम पूर्ण
या परिसरात सुमारे 80 टक्के काम पूर्ण झालं. पण, काही काम बाकी असल्यामुळं पुर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन पुण्यतिथीनिमित्त होऊ शकणार नाही. विकास साखर कारखान्याच्या परिसरात हा पुर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. या स्मरण स्थळावरचे सिमेंट रस्ते आणि काही काम अपूर्ण आहे. त्यामुळं उद्घाटन करता येणार नाही. विलासरावांच्या चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.