Video : इशारों इशारों में…! मतभेदानंतर पुन्हा पालकमंत्री देशमुख अन् खासदार सुधाकर शृंगारे एकाच मंचावर
साहित्य संमेलन होऊन 8 दिवस उलटले असतानाच पुन्हा खा. सुधाकर शृंगारे आणि पालकमंत्री अमित देशमुख हे एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होते ते रमजान ईदचे. या निमित्ताने ते एकत्र आले असले तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान नेमकी काय अडचण झाली होती हे तर पालकमंत्री जाणून घेत नाहीत ना अशी चर्चा आता लातूरमध्ये होऊ लागली आहे.
लातूर : राजकारणाला घेऊन (Latur) लातूरची वेगळी परंपरा आहे. येथील राजकारणात मतभेद असतील पण मनभेद कधीच नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खा. सुधाकर शृंगारे यांनी येथील (local administration) स्थानिक प्रशासनाला घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. हीच बाब लक्षात ठेवत पालकमंत्री अमित देशमुख यांनी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी खासदारांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत त्यांना चिमटा काढला होता. त्यानंतर पुन्हा (Ramzan Eid) रमजान ईदच्या निमित्ताने लातूरच्या ईदगाह मैदानावर पालकमंत्री अमित देशमुख आणि खासदार सुधाकर शृंगारे हे एका मंचावर पहायला मिळाले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याचे तर्क-वितर्क आता लातूरकर आपल्या सोईप्रमाणे लावत आहेत. विशेष म्हणजे ज्या स्थानिक प्रशासनाची तक्रार खा.शृंगारे यांनी केली होती या मनपाचे महापौर विक्रांत गोजमगुंडेही व्यासपीठावर उपस्थित होते.
नेमके काय आहे प्रकरण?
14 एप्रिल रोजीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खा. रामदास आठवले हे लातुरात दाखल झाले होते. दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमातही येथील स्थानिक प्रशासनाकडून त्रास होत असल्याची तक्रार खा. शृंगारे यांनी विरोधी पक्षनेत्यांकडे केली होती. अर्थात ही तक्रार मनपा प्रशासनाबाबत होती. हीच बाब पालकमंत्री अमित देशमुख यांनी 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात मनोगत व्यक्त करताना लक्षात ठेवली. संमेलन समारोपाचा कार्यक्रम आटोपून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जायचे आहे. त्यामुळे सर्वांची नावे घेण्यास उशीर होईल पण खा. सुधाकर शृंगारे यांचे नाव हे घ्यावेच लागेल नाहीतर ते पुन्हा माझी तक्रार नितीन गडकरी यांच्याकडे करतील असे म्हणत चिमटा काढला होता. त्यामुळे क्षुल्लक विषय का असेना राजकारणात किती महत्वाचा ठरतो यावरुल लक्षात येते.
तोच किस्सा अन् तीच चर्चा
साहित्य संमेलन होऊन 8 दिवस उलटले असतानाच पुन्हा खा. सुधाकर शृंगारे आणि पालकमंत्री अमित देशमुख हे एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होते ते रमजान ईदचे. या निमित्ताने ते एकत्र आले असले तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान नेमकी काय अडचण झाली होती हे तर पालकमंत्री जाणून घेत नाहीत ना अशी चर्चा आता लातूरमध्ये होऊ लागली आहे. अखे क्षुल्लक कारणावरुन जरी मतभेद झाले तरी लातूरचे राजकारण किती खेळीमेळीत असते याचा प्रत्यय यावरुन येतो.
लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख अन् खा. सुधाकर शृंगारे एकाच व्यासपीठावर.. pic.twitter.com/nyIp3XG2T1
— TV9 Marathi Live (@tv9_live) May 3, 2022