Video | देशातील पहिल्या खासगी ट्रेनला सुरुवात; कोईम्बतूरमधून शिर्डीत दाखल, 800 जणांनी केला प्रवास

भारत गौरव योजनेंतर्गत देशातील पहिल्या खासगी रेल्वेला मंगळवारी सुरुवात झाली. ही रेल्वे मंगळवारी कोईम्बतूरमधून निघून, आज सकाळी साडेसहा वाजता शिर्डीमध्ये पोहोचली.

Video | देशातील पहिल्या खासगी ट्रेनला सुरुवात; कोईम्बतूरमधून शिर्डीत दाखल, 800 जणांनी केला प्रवास
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 8:56 AM

शिर्डी :  भारत गौरव योजनेंतर्गत देशातील पहिल्या खासगी रेल्वे (Railways) सेवेला मंगळवारी कोईम्बतूर (Coimbatore) येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही ट्रेन कोईम्बतूरहून मंगळवारी निघाली होती. ती आज सकाळी साडेसहा वाजता शिर्डी (Shirdi) साईनगर रेल्वेस्थानकात दाखल झाली आहे. या पहिल्या खासगी रेल्वेमध्ये  एकूण 810 प्रवाशांनी प्रवास केला आहे.  रेल्वे प्रशासनाच्या वतीने  ही ट्रेन एका खासगी सर्व्हिस प्रोव्हायडरला 2 वर्षांच्या करारावर लीजवर देण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या या उपक्रमाला जर प्रवाशांचा प्रतिसाद लाभला, तर येत्या काळात आणखी काही खासगी रेल्वे धावण्याची शक्यता आहे. या पहिल्या वहिल्या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. ही ट्रेन कोईम्बतूरवरून मंगळवारी निघाली होती. ती आज सकाळी शिर्डीमध्ये दाखल झाली आहे. या ट्रेनमधून तब्बल 810 प्रवाशांनी प्रवास केला आहे.

दीड हजार प्रवासी वाहतूक क्षमता

या खासगी ट्रेनमधून एकाच वेळी दीड हजार प्रवासी प्रवास करू शकतात एवढी या ट्रेनची क्षमता असून, तिला एकूण 20 डबे आहेत. विशेष म्हणजे ज्या ट्रेन या मार्गावर नियमित धावतात त्यांना जेवढा तिकिट दर आहे, तेवढाचा तिकीट दर या रेल्वेला असणार आहे. ही रेल्वे महिन्यातून तीनदा कोईम्बतूर-शिर्डी या मार्गावर धावणार आहे. या रेल्वेतील प्रवाशांना साईबाबा मंदिरात दर्शनासाठी व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांना रांगेत जास्त काळ उभे राहावे लागणार नाही.

हे सुद्धा वाचा

भाड्याचे दर किती असणार?

केंद्र सरकारच्या वतीने भारत गौरव योजनेंतर्गत देशातील पहिल्या खासगी रेल्वेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. ही रेल्वे मंगळवारी  कोईम्बतूरहून निघाली होती. ती आज सकाळी शिर्डीत दाखल झाली आहे. खरतर ही खासगी ट्रेन असल्याने प्रवास भाडे किती लागणार असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र काळजी करण्याचे कारण नाही. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देखील सामान्य ट्रेनमध्ये आकारले जाते, तेवढेच भाडे आकारण्यात येणार आहे.  नॉन एसीसाठी 2500 रुपये, थर्ड एसीसाठी पाच हजार रुपये, सेंकड एसीसाठी सात हजार रुपये तर फर्स्ट एसीसाठी दहा हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.  या ट्रेनला एकूण वीस डब्बे असून, प्रवाशांसाठी स्पेशल व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.