OBC Reservation | सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय झालं? याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले…
महाराष्ट्र राज्य सरकारने बेकायदेशीरपणे आरक्षण आणण्याचा प्रयत्न केला होता, असे मत याचिकाकर्त्यांचे वकील विकास सिंग यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील सगळ्या निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) दिला आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य सरकारने बेकायदेशीरपणे आरक्षण आणण्याचा प्रयत्न केला होता, असे मत याचिकाकर्त्यांचे वकील विकास सिंग यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील सगळ्या निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) दिला आहे. राज्य सरकारकडून या खटल्याला राजकीय (Political) रंग दिला जातोय. विनाविलंब मुदत संपण्यापूर्वी सगळ्या निवडणुका (Election) घ्या, असे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. फी जास्त आकारत असल्याच्या प्रश्नाला वकिलांनी उत्तर दिले आहे. वकिलांच्या फीबाबत राज्य सरकारने विचारणा करू नये. वकिलांना भाजपा फी पुरवत असल्याचा सत्ताधारी मंत्र्यांचा आरोप आहे. त्यावर ते बोलत होते. मुद्द्यांवर बोलावे, असेही ते म्हणाले. बारसाठी, सामाजिक कारणांसाठी हे सर्व आहे. त्याची चिंता राज्य सरकारने करू नये, असे ते म्हणाले. राज्य सरकारची सध्याची भूमिका कायद्याला धरून नाही, असे ते म्हणाले.