शरद पवारांच्या उमेदवारांना पाठिंबा, प्रचारही करू पण…; लक्ष्मण हाके यांचं मोठं विधान

शरद पवारांच्या उमेदवारांना पाठिंबा, प्रचारही करू पण...; लक्ष्मण हाके यांचं मोठं विधान

शरद पवारांच्या उमेदवारांना पाठिंबा, प्रचारही करू पण...; लक्ष्मण हाके यांचं मोठं विधान
लक्ष्मण हाके, शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 11:23 AM

विधानसभा निवडणुकीच्या धुमाळीत काही नेत्यांच्या भूमिकेकडे लोकांचं लक्ष आहे. आज सकाळीच मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. ओबीसीचे जे निवडून येणारे उमेदवार आहेत ते कोणत्याही पक्षाचे असोत आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे. आमचे पाठिंबा असलेले उमेदवार – सांगोला, जत, मुखेड, मान, लातूर पूर्वचे आहेत. कोणत्याही पक्षाचा असो. पण निवडून येणारा असावा. शरद पवार यांच्या उमेदवारांच्या उमेदवारांना पाठिंबा असेल पण तो अटीवर असेल, असं हाके म्हणालेत.

शरद पवारांचं नाव घेत लक्ष्मण हाके काय म्हणाले?

ओबीसींच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का लावणार नाही, याला जर शरद पवार यांच्या उमेदवारांचं समर्थन असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. तसं असेल तर शरद पवार यांच्या उमेदवारांसाठी सभाही घेऊ. पण नेत्याच्या सांगण्यावरून उमेदवार काळंबेरं करणार असेल तर आम्ही त्याला पाडा म्हणून सांगू, असं लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलं आहे.

शरद पवार यांचा प्रचार नाही. शरद पवारांचा एखादा ओबीसी उमेदवार असेल, तो ओबीसी आरक्षणाबाबत आम्हाला कन्व्हिन्स करणार असेल तर आम्ही त्यांची सभा घेऊ. जोपर्यंत अशोक चव्हाण ओबीसी आरक्षणाबद्दल जाहीर भूमिका घेणार नाही तोपर्यंत भोकरमध्ये सभा घेणार. माझ्या ६०-७० सभा महायुतीच्या विरोधात झाल्या आहेत. त्यामुळे मी महायुतीचा आहे, असं म्हणू शकत नाही. जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असं लक्ष्मण हाके म्हणालेत.

बाँड पेपर सोडा हो, संविधानाची शपथ घेऊन लोक जागत नाही. मी तर जरांगे पाटलांना शिलालेखावर लिहून घ्या म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे बाँड पेपर सोडा. कुणाची किती नियत साफ आहे हे आम्हाला कळतं. पण शरद पवार यांच्यी एबी फॉर्मवर लढणाऱ्या उमेदवारांबाबत आम्हाला शंका आहे. पण पवारांचा उमेदवार लिहून द्यायला तयार असेल तर आम्ही त्याची सभाही घेऊ, असं लक्ष्मण हाके म्हणालेत.

३ वाजेपर्यंत वाट पाहा- हाके

जातीच्या लढायला संपवाव्यात आम्हालाही वाटतं. पण सुरुवात कुणी केली. पैसे कुणी वाटप केले. भूमिका कोणी घेतल्या. मी पळ काढणारा नाही. माझ्याकडे उमेदवारांची यादी तयार आहे. ३ वाजेपर्यंत वाट पाहा. आमची भूमिका ओबीसींचे हक्क आणि अधिकाराची आहे. राज्यातील २०० मतदारसंघात ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची २ लाखांपेक्षा संख्या आहे. पण २५ पेक्षा जास्त उमेदवार सत्ताधारी पक्षांनी दिलेले नाहीत, असंही हाके म्हणालेत.

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.