…त्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही, लक्ष्मण हाके यांनी कुणाला दिला इशारा

मनोज जरांगे यांनी येणाऱ्या विधान सभा निवडणूकीत 288 उमेदवार उभे करण्याऐवजी पाच उमेदवार उभे करावेत अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

...त्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही, लक्ष्मण हाके यांनी कुणाला दिला इशारा
laxman hake
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 4:49 PM

जरांगे यांना जर उमेदवार उभे करायचे असतील तर त्यांनी आधी आंदोलनाच्या जागी जालनामध्ये पहीला उमेदवार द्यावा अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गव्हर्नमेंटने खुपच एन्टरटेन्मेंट केले होते. ओबीसीना जर असे दुर्लक्षित केले तर भाजपाला विधानसभेत नक्कीच त्रास होईल. परंतू हे पुन्हा सत्तेवर बसले तर 2024 नंतर ओबीसी आरक्षण संपलेले असेल असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

ज्यांना छत्रपतींचे वारसदार आपण मानतो त्या संभाजी राजेंनी फक्त जरांगेंना भेट द्यावी, दीड किमीवरच्या ओबीसी आंदोलकांला भेट दिली नाही. ही का राजेशाही आहे का ? विशालगडावर त्यांनी हातवारे केले. मानसन्मान स्वत:हून दिला जातो. मागून मिळत नाही. जातीयवादी भूमिका त्यांनी घेतली.त्यांना आम्ही राजे का म्हणावे ? ओबीसी आंदोलनाला ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला नाही, केवळ विरोध केला त्या 50 लोकांची यादी तयार आहे, त्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही असाही इशारा लक्ष्मण हाके यांनी यावेळी दिला.

जरांगेंनी पाच उमेदवार उभे करावेत

महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही. मक्तेदारी नाही. ओबीसींच्या हक्काच्या लढाई लढत आहे. ओबीसी आरक्षणा बाबत नेते बेकायदेशीरपणे वागत आहेत. त्यामुळेच निवडणूकनंतर हे आरक्षण संपेल ही भीती आहे. राजकारण पेक्षा ओबीसींची स्थिती काय आहे यावर बोलण्यासाठी मी आलोय. राजकीय पक्ष वापर करून घेतात. फायदा करुन घेतात. निवडणूक जिंकण्याचे व्याकरण नेत्याकडे आहे. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण असे 21 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. जरांगे पाटील हे शरद पवार यांच्या स्क्रीप्टवर काम करतात. जरांगेनी 288 नाही तर निदान 5 उमेदवार तरी उभे करावे अशीही मागणी लक्ष्मण हाके यांनी यावेळी केली

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.