शिवरायांचा पुतळा कोसळणे प्रकरण : फरार आरोपी जयदीप आपटेला शोधण्यासाठी एलसीबी पथक कल्याणमध्ये दाखल
LCB squad in Kalyan To find Jaideep Apte : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या प्रकरणातील आरोपची शोध घेण्यात येत आहे. फरार आरोपी जयदीप आपटेला शोधण्यासाठी सिंधुदुर्ग एलसीबी पथक कल्याणमध्ये दाखल झालं आहे. वाचा सविस्तर......

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला प्रकरणातील फरार आरोपी जयदीप आपटेचा शोध घेण्यासाठी एलसीबी पथक कल्याणमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग एलसीबी पथक कल्याणमध्ये दाखल झालं आहे. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर जयदीप आपटे फरार आहे. घराला घराला टाळं लावून जयदीप आपटे आपल्या कुटुंबासह फरार झाला आहेत. आता एलसीबी त्याचा शोध घेत आहे. एलसीबी पथक कल्याणमध्ये दाखल झालंय.
एलसीबी पथक कल्याणमध्ये
सिंधुदुर्गातील मालवणमध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर, सिंधुदुर्ग एलसीबी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक जयदीप आपटे याचा शोध घेण्यासाठी कल्याणमध्ये दाखल झालं आहे. त्यांनी स्थानिक बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने जयदीप आपटे याच्या नातेवाईकांकडे आणि घराच्या आसपासच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
जयदीप आपटेचा शोध सुरु
पुतळा कोसळल्यानंतर आरोपी जयदीप आपटे हा फरार झाला. त्यामुळे या प्रकरणात नवीन वळण लागलं आहे. पोलिसांनी विविध टीम तयार करून त्याचा शोध सुरु केला आहे. जयदीप आपटे याचा मोबाईल फोन बंद आहे. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. सिंधुदुर्ग एलसीबी आणि बाजारपेठ पोलिसांचे पथक मिळून जयदीप आपटेला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जयदीप आपटे सापडल्यास प्रकरणाच्या चौकशीत आणखी खुलासे होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रकरण काय आहे?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता. डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मात्र उद्घाटनानंतर आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यानंतर आता संताप व्यक्त होत आहे. शिवप्रेमी आणि विरोधक आक्रमक पवित्रा झाले आहेत. तर या प्रकरणातील आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.