Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विष कसं पेरायचं ते सगळं ह्या माणसाकडून शिकावं’, दसरा मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी कुणावर आग ओकली?

महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी आमदार असताना घेतली. तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढलं. मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध केला, असा आरोप पडळकर यांनी केला.

'विष कसं पेरायचं ते सगळं ह्या माणसाकडून शिकावं', दसरा मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी कुणावर आग ओकली?
SHARAD PAWAR, GOPICHNAD PADALKAR, CHHAGAN BHUJBAL Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 9:37 PM

सांगली | 22 ऑक्टोंबर 2023 : आपण एकाच विषयावर अवलंबून राहायचं नाही. महाराष्ट्रातल्या धनगरांनी रस्त्यावरच्या लढाईलासुद्धा तयार राहिलं पाहिजे. महाराष्ट्रभर जागर यात्रेच्या माध्यमातून फिरलो. आज लाखोंचा समुदाय आरेवाडीच्या दसरा मेळाव्याला आला. आपल्यामध्ये फूट पाडावी असा प्रयत्न केला जातोय. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कसे विभागला जाल? अशा पद्धतीचं षडयंत्र महाराष्ट्रामधून राबवलं जातंय. लबाड लांडग्यांच्या पिलावळीनी विष पेरायला सुरुवात केलीय. लबाड xxxx कोण आहे हे तुम्हाला माहित आहे की नाही? त्याच्या पिलावळींनी विष पेरायला सुरूवात केली अशी टीका धनगर समाजाचे नेते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

सांगली येथील आरेवाडीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी दसरा मेळाव घेतला यावेळी बोलताना पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता जहरी टीका केली. बहुजनांचा बुरखा पांघरलेला हा xxxx बहुजनांच्या किती विरोधी आहे हे सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी आमदार असताना घेतली. तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढलं. मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध केला, असा आरोप पडळकर यांनी केला.

फुटलाय याचा पुतण्या आणि लागलेत कुणाच्या मागं?

मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतनं फुटला. आता त्याचा पुतण्या पार्टीतनं फुटला यात दुसऱ्याचा काय दोष आहे? पण, हे सगळेजण छगन भुजबळांच्या विरोधामध्ये शिव्या शाप द्यायला लागलेत. फुटलाय याचा पुतण्या आणि लागलेत कुणाच्या मागं? छगन भुजबळांच्या. का तर हा माळी समाजाचा माणूस आहे म्हणून. गरीब समाजातला माणूस आहे. तर यांच्या पाठीमागं लागायचं. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी केली. पण, या लांडग्याला माहित आहे जर बहुजन एक झाले तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं. म्हणून समता परिषदेला दाबायचा प्रयत्न झाला. गोपीनाथरावजी मुंडे साहेब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले असते. परंतु, काही आमदारांना फूस लावली आणि मुंडे साहेबांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सगळ्या माणसाकडून शिकलं पाहिजे

समाजाचा पहिल्यांदा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाला असता. म्हणजे हे सगळं जे षडयंत्र सुरू आहे. या षडयंत्राकडं आपण नीटपणे बघितलं पाहिजे. या महाराष्ट्रातल्या धनगरांची चळवळ पहिल्यांदा स्वर्गीय बी के कोकरे यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये उभी केली. परंतु बी के कोकरे यांना संपवण्याचं त्यांची संघटना संपवण्याचं मोठं पाप यांनी केलं. माननीय शिवाजी शेंडगे बापूंना राजकारणामध्ये काही काळ वापरून घेतलं. परत त्यांना बाजूला करून टाकलं. त्यांच्या पूर्ण घराला बाजूला करून टाकलं. म्हणजे विष कसं पेरायचं? ते ह्या सगळ्या माणसाकडून शिकलं पाहिजे अशी जळजळीत टीका पडळकर यांनी केली.

नाताळाची सुट्टी झाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या केसचा निकाल

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण दोन टप्प्यात चाललो आहे. महाराष्ट्रातल्या धनगराची आरक्षणाची लढाई आपण न्यायालयामध्ये लढतो आहे. न्यायालयाने आठ डिसेंबर, अकरा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर या तीन तारखा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम सुनावणीसाठी दिलेले आहेत. उच्च न्यायालयाने हेही सांगितलं की नाताळाची सुट्टी झाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या केसचा निकाल आम्ही देणार आहे.

 एक लाख टक्के निकाल आपल्या बाजूनं लागेल

बिरोबाचा आशीर्वाद आहे, माकुबाईचा आशीर्वाद आहे, बाळू मामाचा आशीर्वाद आहे. गेल्या वर्षामध्ये धनगरांवर जितका अन्याय झाला तितका अन्याय देशातल्या कुठल्याच जातीवर झाला नाही. त्यामुळं उच्च न्यायालयामध्ये माननीय मधू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली किमान एकशे सत्तर पुरावे धनगरांच्या बाजूने सादर केले आहेत. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारनं धनगर या राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे शपथपत्रावर दिलंय. 2019, 2022 आणि 2023 ला सरकारच्या वतीने पुन्हा दोन शपथपत्र धनगरांच्या बाजूनं दिले आहेत. म्हणजे जी खरी परिस्थिती होती ती दिलेली आहे आणि त्यामुळं एक लाख टक्के निकाल हा आपल्या बाजूनं लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन.
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?.
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत.
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका.
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव.
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण.
संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका
संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका.
शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवी
शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवी.
पवार साहेबांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केला - अजित पवार
पवार साहेबांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केला - अजित पवार.
अमित शाहांचा कडेलोट करा; संजय राऊत भडकले
अमित शाहांचा कडेलोट करा; संजय राऊत भडकले.