पालघर : वाहनाच्या जबर धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुरवेस साये येथे घडली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या दिशेने मनोर दुरवेस साये येथे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडक्याने बिबट्याचा अपघात झाला. (Leopard Dead in Road Accident Mumbai Ahmadabad highway)
एक वर्षाचा नर जातीचा बिबट्या होता. हा बिबट्या रोड क्रॉस करुन चालला असता त्याचवेळी महामार्गावरुन जास्त वेगाने गाडी आली आणि त्या गाडीची धडक बिबट्याला बसली. या घटनेत बिबट्याला डागीच मृत्यू झाला.
दरम्यान, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर असून पंचनामा केला आहे. तसंच अज्ञात वाहनाच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Leopard Dead in Road Accident Mumbai Ahmadabad highway)
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा :
नालासोपाऱ्यात पुर्ववैमन्यासातून दोघांवर गोळीबार, एक जण गंभीर जखमी
API भूषण पवार यांची गोळी झाडून घेत आत्महत्या, APMC पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार