84 चा होऊ दे, की 90 चा… आता हा म्हातारा थांबणार नाही… शरद पवार गरजले
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर होण्याच्या आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांच्या विधानाने राजकारणात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणूकांच्या तारखांची आज मंगळवारी घोषणा होणार असल्याने राजकारण ढवळले गेले आहे. या दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. एका कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की काही तरुण मंडळी हातात फलक घेऊन उभी होती. त्यात माझा फोटो होता. ज्यात लिहीले होते की 84 वर्षांचा म्हातारा.. परंतू तुम्ही चिंता करुन नका. आम्हाला दुरपर्यंत जायचे आहे. हा म्हातारा माणूस काही थांबणारा नाही. मग 84 वर्षांचा होऊ दे की 90 चा ..हा म्हातारा तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत महाराष्ट्र नीट रुळावर येणार नाही…
वास्तविक शरद पवार एका कार्यक्रमात भाषण करीत होते. त्यावेळी एका किस्सा सांगताना ते म्हणाले की काही तरुण मुलं हातात फलक घेऊन उभी होती. तरुण कार्यकर्त्यांचा इशारा होता की आता शरद पवार म्हातारे झाले आहेत त्यांनी राजकारण सोडून द्यायला हवे. त्यामुळे शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांच्या पक्षात गेल्यावर्षी फूट पडून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी बळकावली होती. त्यानंतर अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री पद मिळविले आहे.त्यानंतर अजित पवार यांनी अनेक शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करीत त्यांच्यावर टीका केली आहे. आपल्याला म्हातारा झाल्यावर संधी मिळणार का ? काही जण वय झाले तरी थांबायला तयार नाहीत अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
निवडणूक आयोग मंगळवारी दुपारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणार आहे. दुपारी 3.30 या संदर्भात पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे. तर झारखंडचा कार्यकाळ पुढच्या वर्षी 5 जानेवारीला संपणार आहे.