मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी, पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता
मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. मुंबईत काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामध्ये दादर,परळ भागात पाऊस झाला आहे.
मुंबई – मुंबईत (Mumbai) सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. मुंबईत काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामध्ये दादर (Dadar) , परळ भागात पाऊस झाला आहे. पुण्यात सुध्दा सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे आणि परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवेमध्ये गारठा निर्माण झाल्याने उकाडयाने हैराण झालेल्या पुणेकरांना (Pune) काहीसा दिलासा मिळाला आहे.
#Mumbai | #rains | मुंबईत ठिकठिकाणी पावसाच्या सरी, अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ, तर ढगाळ वातावरणानं पावसाच्या सरींची दाट शक्यता #WeatherUpdate तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावासाचा इशारा
वाचा सविस्तर बातमी : https://t.co/hNXb3YNNTH pic.twitter.com/p0K00RsOsh
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2022
अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची चांगलीचं तारांबळ उडाली
मुंबईत ठिकठिकाणी पाऊस पडायला सुरूवात झाली. अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची चांगलीचं तारांबळ उडाली आहे. तर ढगाळ वातावरणानं पावसाच्या सरींची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील तीन शहरे जगतातील सर्वाधिक उष्ण
ब्रम्हपूरी 45.3 तापमानासह जगतातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद झाली आहे. चंद्रपूर 45.2 तापमानासह जगतातील दुसरे उष्ण शहर आहे. अकोला ४४.९ तापमानासह जगतातील तिसरे उष्ण शहर आहे. जगातील पहिल्या 15 उष्ण शहरांमध्ये विदर्भातील अमरावती वर्ध्यासह पाच शहरं आहेत. कडाक्याच्या उष्णतेमुळे विदर्भात जिवाची लाही लाही होत होत आहे. अनेक दिवसांपासून कडाक्याचं ऊन असल्याने लोकांना अधिक त्रास होत आहे.