तुळजाभवानी देवीचे मंदिर आकर्षक रोषणाईने उजळले, ‘आई साहेब’ आणि ‘आई राजा उदो उदो’ची रोषणाई, भक्तांची पाहण्यास गर्दी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव जवळ असल्याने मंदिर प्रशासनासह नगर परिषद व पोलीस विभागाची तयारी जोरात सुरु आहे.

तुळजाभवानी देवीचे मंदिर आकर्षक रोषणाईने उजळले, 'आई साहेब' आणि 'आई राजा उदो उदो'ची रोषणाई, भक्तांची पाहण्यास गर्दी
तुळजाभवानी देवीचे मंदिर आकर्षक रोषणाईने उजळले, 'आई साहेब' आणि 'आई राजा उदो उदो'ची रोषणाई, भक्तांची पाहण्यास गर्दी
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 1:08 AM

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव जवळ असल्याने मंदिर प्रशासनासह नगर परिषद व पोलीस विभागाची तयारी जोरात सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीच्या राजे शहाजी महाराज व जिजाऊ महाद्वार यासह मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीच्या महाद्वारावर ‘आई साहेब’ आणि ‘आई राजा उदो उदो’ असे विविध आकर्षक रोषणाईने लिहले आहे. तुळजाभवानी व तुळजापूर मंदीर हे रोषणाईने नटले असून ही आकर्षक रोषणाई कॅमेरात कैद करण्यासाठी आणि पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. मंदिर समोरील भाग हा सध्या सेल्फी पॉईंट ठरत आहे.

विद्युत रोषणाई आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरणार

पुणे येथील श्री देविभक्त उंडाळे व टोळगे बंधुची श्री तुळजाभवानी मातेवर अपार श्रद्धा असल्याने गेल्या 7 वर्षांपासून ही मंडळी मंदीर परिसरात आकर्षक रोषणाई सेवा म्हणून देवीच्या चरणी अर्पण करतात. ही सेवा ते कोणताही आर्थिक मोबदला तुळजाभवानी मंदीर संस्थान कडून न  घेता करत आहेत. तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवातील ही विद्युत रोषणाई आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरणार आहे. तुळजाभवानी देवी ही भक्तांची आई असल्याने देवीला ‘आई साहेब’ असे आदराने व भक्तीने भाविक हाक मारतात तर देवीची पूजा करण्यापूर्वी व कोणतेही शुभ काम करताना ‘ आई राजा उदो उदो’ असा जागर भाविक करीत असतात. त्यामुळे याची रोषणाई करण्यात आली आहे.

पुणे येथील विजय उंडाळे, नितीन उंडाळे, संजय टोळगे आणि सोमनाथ टोळगे हे देविभक्त 2014 पासून श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात संपूर्ण मंदीरावर आकर्षक अशी  विद्युत रुषणाई रुपी सेवा करीत आहेत. विजय उंडाळे यांनी 2013 साली श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानला चांदीची उत्सवमुर्ती अर्पण केली होती. यंदा लाईटइफेक्ट असणारी विद्युत रोषणाई अर्पन करण्यात आली. त्याचबरोबर देवीच्या गाभाऱ्यात गाभारा गरम न होणारी पावरफुल्ल लाईट बसविण्यात येणार आहे. तर निंबाळकर दरवाजा, कुंडावर आणि परिसरात रोषणाई केली जाणार आहे, अशी माहिती पूजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी दिली.

नवरात्र पासून मंदिरे खुली होणार

कोरोना संकटामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली मंदिरे सुरू होणार असल्याने भाविक, पूजारी आणि व्यापारी आनंदी आहेत. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीसह अन्य मंदिरे नवरात्रच्या पहिल्या दिवसापासून सूरु होणार असल्याने गर्दी वाढत आहे. तर देवीच्या दर्शनाची भाविकांना आतापासूनच ओढ लागली आहे. मंदिर रोषणाई कॅमेरात टिपण्यासाठी भाविक येत आहेत.

जुनी विद्युत रोषणाई साहित्य मोफत मंडळाना भेट

गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी नवीन विद्युत रोषणाई केली जाते. जुनी विद्युत रोषणाई साहित्य उंडाळे-टोळगे हे गावी न नेता सार्वजनिक देविमंडळे मंदीर यांना मोफत देतात. त्यांनी विद्युत रोषणाई आजपर्यंत कर्नाटकातील विजापूर,अहमदनगर, लातूर, बार्शी, उदगीर येथील मंडळाना दिली आहे.

मंदीर प्रशासनाची पोलीस बंदोबस्तासह इतर तयारी युद्धपातळीवर

तुळजाभवानी देवीचे मंदिर वर्षानंतर खुले होणार असल्याने आणि त्यातच देवीचा मुख्य नवरात्र उत्सव असल्याने भाविक लाखोंच्या संख्यने तुळजापूरात येणार आहेत. त्यामुळे कमी वेळेत नियोजन करणे प्रशासनासाठी तारेवरची कसरत व एक आव्हान ठरणार आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक निवा जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार योगिता कोल्हे, सौदागर तांदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजुम शेख, पोलीस निरीक्षक अजीनाथ काशीद, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यासह महंत व पूजारी मंडळाचे पुजारी प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा : मुंबईतील शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युला ठरला; वर्षा गायकवाड आणि पालिका आयुक्तांच्या चर्चेतून निघाला मार्ग

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.