Video: कोल्हापुरात वीज पडतानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद, ट्रान्सफॉर्मरवर बघा कसा जाळ उडाला!
कोल्हापूर शहरातील एका वीजेच्या ट्रान्सफॉर्मवर वीज कोसळली. हा व्हिडीओ अनेकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला. व्हिडीओ पाहून अक्षरश: अंगावर काटा येतोय. (Lightning Strikes On Electricity Transformer In kolhapur Video Viral in Social Media)
कोल्हापूर : राज्याच्या विविध भागांत सध्या पूर्वमोसमी पाऊस पडतोय. या पावसाला वळवाचा पाऊस देखील म्हणतात. साधारण मान्सूनच्या अगोदर हा पाऊस पडत असतो. गेले आठवडाभर वीजांच्या कडकडाटासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पाऊस पडतोय. मंगळवारी कोल्हापूरमध्येही विजांसह जोरदार पाऊसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील एका वीजेच्या ट्रान्सफॉर्मवर वीज कोसळली. हा व्हिडीओ अनेकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला. व्हिडीओ पाहून अक्षरश: अंगावर काटा येतोय. (Lightning Strikes On Electricity Transformer In kolhapur Video Viral in Social Media)
वीजेच्या ट्रान्सफॉर्मवर वीज कोसळली
कोल्हापुरातील प्रतिभानगर परिसरात वीजेच्या ट्रान्सफॉर्मवर वीज कोसळली .पाऊस कोसळण्याच्या अगोदर जोरदार विजांचा लखलखाट आणि कडकडाट सुरु होता. यावेळी एक वीज वीजेच्या ट्रान्सफॉर्मवर कोसळली. ज्या क्षणी वीजेच्या ट्रान्सफॉर्मवर वीज कोसळली त्या क्षणी ट्रान्सफॉर्मरवर मोठा जाळ पाहायला मिळाला. सदर घडलेल्या प्रकाराने परिसरातील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. कोल्हापुरातील अनेक भागांत अनेक तास गेलेली वीजच आली नाही. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागला.
ट्रान्सफॉर्मरवर मोठा जाळ, अनेकांच्या मोबाईल कॅमेरात व्हिडीओ कैद
या प्रसंगाचा व्हिडीओ अनेकांच्या मोबाईल कॅमेरात कैद झालाय. वीज पडली, असा शब्दप्रयोग अनेक वेळा होतो. अनेकांच्या तोंडून तो ऐकायला मिळतो. मात्र प्रत्यक्षात वीज कशी कोसळते आणि वीज पडल्यानंतर काय होतं, हे सगळं या व्हिडीओत पाहायला मिळतं. जमिनीवर जरी वीज पडली त्या ठिकाणी मोठा खड्डा होऊन पाण्याचा डोह पाहायला मिळतो. कोल्हापुरातील ट्रान्सफॉर्मवर पडलेल्या वीजेने मोठा जाळ पाहायला मिळाला.
पाहा व्हिडीओ :
(Lightning Strikes On Electricity Transformer In kolhapur Video Viral in Social Media)