उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार; लोकसभा मतदारसंघातील काय आहे चित्र ?

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याप्रमाणेच शिवसेना (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे देखील यावेळी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या लोकसभा उमेदवाराला मतदान करू शकणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब उत्तर मध्य मुंबईत राहतात. मात्र जागा वाटपामध्ये हा मतदार संघ काँग्रेसला मिळाला आहे.

उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार; लोकसभा मतदारसंघातील काय आहे चित्र ?
शिवसेना नव्हे उद्धव ठाकरे काँग्रेसला देणार मत
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 12:48 PM

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून गेल्या आठवड्या, शुक्रवारी (१९ एप्रिल) देशभरासह, महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. लवकरच देशभरात इतर ठिकाणीही मतदान होणार असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी एकूण ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. मुंबईसह काही ठिकाणी २० मे रोजी मतदान होईल. मात्र काँशिवसेना (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे हे दयावेळी शिवसेनेच्या नव्हे तर काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनाही यावेळी त्यांच्या पक्षाच्या नव्हे तर इतर पक्षाच्या उमेदवाराला मत देऊ शकणार नाहीत.

ठाकरे कुटुंब करणार काँग्रेसला मतदान

आता हे असं का ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे विविध जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब उत्तर मध्य मुंबईत राहतात.पण महाविकास आघाडी (MVA) यांच्यातील जागावाटपाच्या करारानुसार, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे तेथून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय हे त्यांच्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतील.

दिल्लीची जागा आपच्या वाट्याला

1989 पासून शिवसेना आणि भाजपची युती होती. दोन्ही पक्षांनी सर्व निवडणुका एकत्र लढवल्या. त्यामुळे मुंबईतील लोकसभेच्या बहुतांश जागांवर उमेदवार निवडून आणण्यास मदत झाली. मात्र भाजप आणि शिवसेनेचं फाटलं. आता राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना (उबाठा) हे तिघेही एकत्र निवडणूक लढवणार असून उत्तर मध्य मुंबईतील जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना तिथे शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करता येणार नाही. तर दुसरीकडे याचप्रमाणे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करता येणार नाही. दोघेही नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे मतदार आहेत. INDIA च्या जागावाटपात काँग्रेसला ही जागा मिळाली नसून आम आदमी पक्षाकडे ( आप) ही जागा गेली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.