Maharashtra Corona Update: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील 25 जणांना कोरोना
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live Updates Breaking News
[svt-event title=”रुबी हॉल क्लिनिकमधील 25 जणांना कोरोना” date=”21/04/2020,2:10PM” class=”svt-cd-green” ] पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील 25 जणांना कोरोनाची लागण, यामध्ये तीन डॉक्टर, 16 नर्स आणि सहा कर्मचाऱ्यांचा समावेश, पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 803 वर [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील ससून,नायडू आणि भारती हॉस्पिटलमधील आयसोलेशन बेड्स फुल्ल” date=”21/04/2020,12:56PM” class=”svt-cd-green” ] पुणे – कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ससून आणि नायडू हॉस्पिटल झाले फुल्ल, ससून,नायडू आणि भारती हॉस्पिटलमधील सर्व आयसोलेशन बेड्स संपले आहेत, त्यामुळे पालिका प्रशासन आता आणखी काही खाजगी रुग्णालयाच्या शोधात आहे, ससून – 100, नायडू – 120 तर भारती – 135 बेड्सची व्यवस्था आहे, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलीय, खाजगी हॉस्पिटल मिळाले नाहीत तर वसतिगृहही ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये कडकडीत बंद” date=”21/04/2020,12:49PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event title=”दादर पोलीस वसाहतीत कोरोनाचा शिरकाव, एका पोलिसाला कोरोना” date=”21/04/2020,12:35PM” class=”svt-cd-green” ] दादर पोलीस वसाहतीत कोरोनाचा शिरकाव, एका इमारतीतील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, 14 एप्रिलपासून येत होता ताप, वरळी कोळीवाडा येथे ड्युटीला होते, काल सायंकाळी वैद्यकीय अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न. पोलीस कर्मचाऱ्यासह कुटुंबातील अन्य 3 जणांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलला हलवले. इमारतीचा पहिला मजला सील. महापालिका आरोग्य पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी इमारतीत दाखल. इमारतीत निर्जंतुकीकरण फवारणी सुरू. [/svt-event]
[svt-event title=”पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत, त्यांच्यावर आणखी ताण नको” date=”21/04/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ]
पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत, त्यांच्या कुटुंबावर ताण वाढणार नाही, याची काळजी घ्यायला हवी : शरद पवार लाईव्ह https://t.co/geObg96uI5 pic.twitter.com/Pw8yr79hbC
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पालघर प्रकरणावरून राजकारण करू नका, त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही” date=”21/04/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ]
पालघर प्रकरणावरून राजकारण करू नका, त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही, सध्याच्या स्थितीत नकारात्मकता कमी करण्याची गरज आहे : शरद पवार लाईव्ह https://t.co/geObg96uI5 pic.twitter.com/cElv8lrlM8
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पालघर हत्या प्रकरणी आरोपी गजाआड : शरद पवार” date=”21/04/2020,11:20AM” class=”svt-cd-green” ]
पालघर हत्या प्रकरणी आरोपी गजाआड आहेत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं चुकीचं चित्र निर्माण केलं जात आहे : शरद पवार लाईव्ह https://t.co/geObg96uI5 pic.twitter.com/5sP0gZls24
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”संकटांबाबत निगेटिव्ह विचार सोडून द्या : शरद पवार” date=”21/04/2020,11:18AM” class=”svt-cd-green” ]
संकटांबाबत निगेटिव्ह विचार सोडून द्या, बातम्या भीती निर्माण करणाऱ्या नको, आत्मविश्वास वाढवणाऱ्या हव्या, ही माध्यमांना विनंती : शरद पवार लाईव्ह https://t.co/geObg96uI5 pic.twitter.com/oH0XgiWjLd
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”शेती आणि काही उद्योगांना परवानगी देता येऊ शकेल : शरद पवार” date=”21/04/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ]
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशी ठिकाणं वगळता इतरत्र थोडी सवलत देण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, शेती आणि काही उद्योगांना परवानगी देता येऊ शकेल : शरद पवार लाईव्ह https://t.co/geObg96uI5 pic.twitter.com/7BNTSWI01G
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपली स्थिती बरी, पण समाधान मानू नये ” date=”21/04/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ] पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपली स्थिती बरी असली, तरी समाधान मानता कामा नये, हि स्थिती कशी सुधारता येईल, हे पाहायला हवे, मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणमध्ये अधिक काळजी घ्यावी लागेल : [/svt-event]
[svt-event title=”राज्यातील २२३ हा मृतांचा आकडा धक्कादायक : पवार” date=”21/04/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ]
भारतात ‘कोरोना’चे ५९० बळी, तर महाराष्ट्रात सर्वाधिक २२३ जणांचा मृत्यू, इटलीसारखा देश ज्याचं आकारमान महाराष्ट्रासारखं आहे तिथे २३ हजार बळी, पण राज्यातील २२३ हा आकडा धक्कादायकच, पाश्चिमात्य देशांशी तुलना नको : शरद पवार लाईव्ह https://t.co/geObg96uI5 @PawarSpeaks pic.twitter.com/vu6BNApS6q
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अमेरिकेतही मृत्यूचं प्रमाणा जास्त – पवार” date=”21/04/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ]
अमेरिकेसारखा आरोग्य आणि संसाधनांची उत्तम स्थिती असलेला देश, पण तिथे ‘कोरोना’मुळे मृत्यू पडलेल्या नागरिकांची संख्या ४० हजारावर : शरद पवार लाईव्ह https://t.co/geObg96uI5 @PawarSpeaks pic.twitter.com/11F0kEHIA5
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”आपण पुढचे १२ दिवस काळजी घेतली तर लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही : पवार” date=”21/04/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ]
आपण पुढचे १२ दिवस काळजी घेतली, लॉकडाऊनच्या काळात यत्किंचितही वाढ करावी लागणार नाही, याची खबरदारी घेतली, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील : शरद पवार लाईव्ह https://t.co/geObg96uI5 @PawarSpeaks pic.twitter.com/xbe93anF7c
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बारामती शहरात माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई” date=”21/04/2020,8:45AM” class=”svt-cd-green” ] बारामती शहरात माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई, 250 ते 300 जणांचा समावेश, सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर आणलं, लॉकडाऊनच्या काळात मॉर्निंग वॉक करणं भोवणार [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील नायडू रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नर्सला संसर्ग” date=”21/04/2020,8:37AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील नायडू रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नर्सला संसर्ग, तिच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु, नर्सची प्रकृती स्थिर, तिच्या संपर्कात आलेल्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणं नाहीत [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह TV” date=”21/04/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event title=”Corona : पुण्यातील 5 तालुक्यातील 27 गावंही सील” date=”21/04/2020,8:21AM” class=”svt-cd-green” ]
Corona : पुण्यातील 5 तालुक्यातील 27 गावंही सीलhttps://t.co/rzVv3M5MSA#PuneFightsCorona #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार : राजेश टोपे” date=”21/04/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ]
मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार : राजेश टोपे https://t.co/u7tBRQ0rRY @rajeshtope11
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अकोला शहरातील दानाबाजारातील दुकानांना भीषण आग” date=”21/04/2020,8:04AM” class=”svt-cd-green” ] अकोला शहरातील दानाबाजारातील दुकानांना भीषण आग, 8 ते 10 दुकानं जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत अग्निशमनच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळावर, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील ससून रुग्णालयात 57 वर्षीय महिलेचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू” date=”21/04/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील ससून रुग्णालयात मध्यरात्री कोंढव्यातील 57 वर्षीय महिलेचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू, शहरात एका दिवसात 80 नवे रुग्ण [/svt-event]
[svt-event title=”नागपूरात 8 कोरोना रुग्ण वाढले, एकूण रुग्णांची संख्या 81 वर” date=”21/04/2020,7:57AM” class=”svt-cd-green” ] नागपूरात 20 एप्रिलला दिवसभरात 8 कोरोना रुग्ण वाढले, नागपुरातील रुग्णांची संख्या 81 वर, कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये लहान मुलं आणि वृद्धाचा समावेश, मृतकाच्या संपर्कातील 7 जण कोरोना पाॅझिटिव्ह, 20 दिवसांमध्ये नागपूर शहरात 64 रुग्ण वाढले [/svt-event]
[svt-event title=”कोरोनाचे रुग्ण आढळलेली पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 27 गावंही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित” date=”21/04/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचे रुग्ण आढळलेली पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 27 गावंही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा निर्णय, या तालुक्यांमधील संबंधित गावं पूर्णपणे सील असणार [/svt-event]
[svt-event title=”भिवंडीतून कामगारांना घेऊन उत्तरप्रदेशला जाणाऱ्या कंटेनरवर कारवाई” date=”21/04/2020,7:27AM” class=”svt-cd-green” ] भिवंडीतून कामगारांना घेऊन उत्तरप्रदेशला जाणाऱ्या कंटेनरवर कारवाई, कंटेनरमध्ये सुमारे 60 नागरीक, एक महिला व दोन लहान मुलांचाही समावेश, चालक घटनास्थळावरुन पसार [/svt-event]
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |