मोठी बातमी: कोरोनाचा धोका वाढला; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुनश्च: लॉकडाऊन

यवताळमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे. | Lockdown in Maharashtra

मोठी बातमी: कोरोनाचा धोका वाढला; राज्यातील 'या' जिल्ह्यात पुनश्च: लॉकडाऊन
या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 3:31 PM

यवतमाळ: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अखेर यवतमाळ जिल्हा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे. यवतमाळमध्ये कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात 29 , जानेवारी महिन्यात 25 मृत्यू झाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दरात मोठी वाढ झाली आहे. (Lockdown in yavatmal)

पांढरकवडा आणि पुसदमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित

यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद या तीन ठिकाणी सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढणाऱ्या तीन ठिकाणाहून प्रतिदिन प्रत्येकी 500 याप्रमाणे दिवसाला 1500 नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे, याबाबत विश्लेषण करून डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांनी सादर करावा. सोबतच खाजगी रुग्णालय येथे कोरोनामुळे मृत्यू होण्याची कारणे याबाबत ऑडीट रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. हाय -रिस्क, लो-रिस्कनुसार लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या का वाढली?

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर कोरोनाच्या रुग्णाचा आलेख वाढत आहे त्याचे कारणे म्हणजे सोशल डिस्टनसिंग न पाळणे, लग्न समारंभ मध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे, आधी नियम पायदळी तुडविल्याने हा आलेख वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

अखेर अजित पवारांचा इशारा खरा ठरला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी मुंबई झालेल्या पत्रकारपरिषदेत यवतमाळसह आणखी दोन जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा दिला होता. शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय राठोड, यशोमती ताई, बच्चू कडू यांच्याशी मी बोललो आहे. कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर तिथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मी त्यांच्या कानावर घातले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातल्या ह्या 11 शहरांवर लॉकडाऊनचं संकट? कोरोना वाढतोय, यंत्रणा अलर्टवर!

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही? वाढत्या कोरोनावर मुख्यमंत्र्यांचे 6 मोठे निर्णय

(Lockdown in yavatmal)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.