आपलाच सायब निवडून येणार यावर दोघांनी लावली बुलेटची पैज आणि घडलं भलतंच….

Lok sabha 2024 : लोकसभेच्या निवडणूकांचा महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या टप्प्याचे मतदान अवघ्या काही तासांवर आले आहे. तिकडे सांगलीत तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले, परंतू दोघा मित्रांनी उमेदवारांवर अनोखी पैज लावली आणि ती त्यांच्या चांगलीच अंगलट आली...

आपलाच सायब निवडून येणार यावर दोघांनी लावली बुलेटची पैज आणि घडलं भलतंच....
Lok sabha 2024Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 3:13 PM

सांगली – लोकसभेच्या निवडणूकांचा चांगलाच धुरळा उडालाय…कार्यकर्ते जोरदार प्रचार करुन पायाला भिंगरी लावल्यागत फिरत आहेत. आता महाराष्ट्रातील पाचवा आणि शेवटच्या टप्प्याच्या मतदानाची तयारी जोरदार सुरु झाली आहे. प्रचार तर काल सायंकाळीच संपला आहे. राज्यात 13 लोकसभा मतदार संघात अवघ्या काही तासांत मतदान सुरु होत आहे. परंतू सांगलीत भलतेच घडले आहे. येथे आपलाच सायब निवडून येणार अशी पैज दोघा कार्यकर्त्यांनी लावली आणि घडलं भलतंच…पाहा नेमका काय प्रकार घडला ते…

शनिवारी सायंकाळी सहा वाजता राज्यातील 13 मतदार संघातील पाचव्या आणि राज्यातल्या शेवटच्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचाराची सांगता झाली आहे. आता कार्यकर्ते कुजबुज गाठीभेटी अशा स्वरुपात फिरत आहेत. उद्या सकाळी सात वाजता महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचे मतदान सुरु होणार आहे. हा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आहे. यानंतर देशात इतर राज्यात आणखी दोन टप्पे सहावा आणि सातवा असे होणार आहेत. त्यामुळे इतर राज्यात प्रचार सभा सुरुच राहणार आहेत. महाराष्ट्रात उद्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघ अशा तेरा जागांवर अवघ्या काही तासांत मतदान सुरु होत आहे. या मतदानासाठी जोरदार बंदोबस्त करण्यात आला आहे.

सांगलीत मित्रांची जिरली

अशात सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाले. मात्र येथे आपलाच उमेदवार निवडून येणार अशी पैज दोघा कार्यकर्त्यांनी लावली. या दोघा मित्रांपैकी एकाने आपला उमेदवार जिंकला तर तुला बुलेट गाडी देतो तर दुसऱ्या मित्राने आपला उमेदवार जिंकला तर तुला युनिकॉर्न देतो अशी पैज लावली. शिरढोण येथील रहीवासी जाधव यांनी संजय काका पाटील हेच निवडून येतील अशी पैज लावली. तर त्याचा मित्र गौस मुलाणी यांनी विशाल पाटील हेच निवडून येतील, अशी पैज लावली. त्यातून दोघांनी आपल्या बुलेट आणि होंडा युनिकॉर्न गाड्या एकमेकांना देण्याची पैज लावली. परंतू घडलं भलतंच अजून निकाल दूर 4 जून असताना या दोघांचा निकाल पोलिसांनीच लावला.

नेमके काय झालं –

सांगलीत महायुतीचे भाजपाच्या तिकीटावर महाविकास आघाडीचे उमेदवारसंजयकाका पाटील उभे आहेत. तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील तर कॉंग्रेसचे बंडखोर विशाल पाटील उभे आहेत. परंतू या दोघा मित्रांनी हा पैजेचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केला त्यामुळे त्यांची चांगलीच वाट लागली. आता या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे पैज लावून ती सोशल मीडियावर व्हायरल करणे हे दोघा मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. यावरुन परिसरात एकच चर्चा सुरु आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.