ठाणे जिल्ह्यात मतमोजणीच्या किती फेऱ्या, मोठी अपडेट काय?; यंत्रणा सज्ज

ठाणे लोकसभा मतदार संघाची मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. घोडबंदर येथील एका शाळेत मतमोजणी केली जाणार आहे. तर कल्याण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी डोंबिवलीत होणार आहे. येत्या 4 जूनला सकाळी 8 वाजता येथील मतदार मोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात मतमोजणीच्या किती फेऱ्या, मोठी अपडेट काय?; यंत्रणा सज्ज
vote counting will be held in Thane districtImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 9:26 PM

18 व्या लोकसभेसाठी मतदानाच्या सहा फेऱ्या पार पडल्या असून सातवी फेरीचे मतदान उद्या 1 जून रोजी पार पडणार आहे. ठाणे लोकसभेसाठी मतदान 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात झाले. ठाण्यासह देशभरातील मतदानाची मोजणी येत्या 4 जून रोजी होत आहे. ठाण्यातील मतमोजणी 4 जूनला सकाळी 8 वाजता सुरु होत आहे. मतमोजणीसाठी ठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रोडवरील कावेसर येथील न्यू होरायझन स्कॉलर स्कूलमध्ये पार पडणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहीती ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली आहे.

ठाण्यातील मतमोजणीकरीता मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण शिबीर नुकतेच पार पडले आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम दि. 3 जून 2024 रोजी मतमोजणी स्थळी सकाळी 11.00 वाजता होणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 या प्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 सुपरवायझर, 2 मतमोजणी सहाय्यक व 1 सूक्ष्म निरीक्षक (Microbserver)असणार आहेत. तर प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी सुपरवायझर, 1 पर्यवेक्षक आणि 1 मतमोजणी सहायक, 1 शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच स्ट्राँगरुममधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून यासाठीही स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

मीरा भाईंदर मतदार संघात 33 फेऱ्या

मीरा भाईंदर विधानसभा ( 145 ) मतदारसंघातील मतमोजणीसाठी 33 फेऱ्या, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 34 फेऱ्या, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 24 फेऱ्या, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 26 फेऱ्या, 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 31 फेऱ्या, 151 बेलापूर मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण 28 फेऱ्या होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली आहे.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण एक हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर एकूण 650 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली त्याचप्रमाणे मतमोजणी  प्रक्रियाही सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे जायभाये यांनी म्हटले आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघ

कल्याण लोकसभा मतदार ( 24  ) संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे मतदान 20 मे रोजीच संपन्न झाले होते. कल्याण लोकसभा मतदार संघातील मतमोजणीला डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी या बंदीस्त क्रीडागृहात 4 जून रोजी सकाळी 8 पासून प्रारंभ होणार आहे.

3 जून रोजी शेवटची रंगीत तालीम

या मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण शिबीर दि. 28 मे रोजी डोंबिवली (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात संपन्न झाले. आता मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण शिबीर ( रंगीत तालीम ) दि. 03 जून रोजी सकाळी 06.00 वाजता डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात ठेवण्यात आले आहे.

84 टेबलवर मतमोजणी

मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रती विधानसभा मतदार संघात 14 याप्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी होणार असून, मतदानाच्या एकूण 29 फेऱ्या होणार आहेत. या मतमोजणी कामी एकूण 600 अधिकारी आणि कर्मचारी ( पोलीस स्टाफ वगळून ) वर्गाची नियुक्ती केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.