आतापर्यंत लोकमान्य टिळक पुरस्कार कुणा-कुणाला देण्यात आला आहे?

Lokmanya Tilak Award : लोकमान्य टिळक पुरस्काराचं स्वरूप काय? आतापर्यंत कुणा-कुणाला देण्यात आला? वाचा सविस्तर...

आतापर्यंत लोकमान्य टिळक पुरस्कार कुणा-कुणाला देण्यात आला आहे?
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 2:16 PM

पुणे | 01 जुलै 2023 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना टिळकांच्या स्वदेशी चळवळीच्या जवळ जाणारी आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेमुळे देशातील उद्योगांना चालना मिळाली. त्यामुळे यंदाचा हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. मात्र हा पुरस्कार कधीपासून सुरु झाला. याआधी कुणाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या प्रदान करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं यंदाचं 41 वं वर्ष आहे. 1983 पासून हा पुरस्कार देण्यात सुरुवात झाली.

पुरस्काराचं स्वरूप

विविध क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळकांच्या 103 व्या पुण्यतिथीचं औचित्य साधत यंदाचा पुरस्कार देण्यात आला. टिळकांच्या स्वदेशी चळवळीने प्रेरित होत हा सन्मान दिला जातो. आत्मनिर्भर भारत संकल्पनेसाठी मोदींना हा सन्मान प्रदान केला गेला. आतापर्यंत 40 जणांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. 1981 सालापासून टिळक सन्मानाची सुरुवात झाली आहे.

टिळकांच्या कार्यात स्वदेशी चळवळ सर्वाधिक महत्वाची होती. त्याचप्रमाणे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेनं स्वदेशी उद्योगांची प्रगती झाली. याच हेतूनं हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे, असं टिळक स्मारकच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

आतापर्यंत कुणा-कुणाचा पुरस्काराने सन्मान

एस. एस जोशी

गोदावरी परूळेकर

इंदिरा गांधी

श्रीपाद डांगे

बाळासाहेब देवरस

पांडुरंग शास्त्री आठवले

डॉ. शंकर दयाळ शर्मा

अटलबिहारी वाजपेयी

टी. एन शेषन

डॉ. मनमोहन सिंह

डॉ. विजय भाटकर

राहुल बजाज

एम एस स्वामीनाथन

डॉ वर्गीस कुरियन

रामोजी राव

सॅम पित्रोदा

प्रणव मुखर्जी

शरद पवार

बाबा कल्याणी

सोमन वांगचूक

डॉ. सायरन पुनावाला

डॉ. टेस्सी थॉमस

आणि यंदा नरेंद्र मोदी

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.