अजित पवार यांचा लोकसभेचा अर्ज नामंजूर, शरद राम पवार यांचा अर्ज मंजूर; बारामतीत कशी रंगणार लढत?

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत रंजक मोडवर आली आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना होणार आहे. पवार कुटुंबातच ही लढत होणार असल्याची चर्चा असतानाच शरद पवार नावाचा एक उमेदवारही मैदानात उतरल्याने रंजक वाढली आहे. अर्थात या शरद राम पवार यांचा पवार कुटुंबीयांशी काहीही संबंध नाही. केवळ नामसाधर्म्य आहे.

अजित पवार यांचा लोकसभेचा अर्ज नामंजूर, शरद राम पवार यांचा अर्ज मंजूर; बारामतीत कशी रंगणार लढत?
ajit pawar
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 1:42 PM

देशभरात निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. त्यामुळे देशातील निवडणुकीचं रणही चांगलंच तापलं आहे. काही ठिकाणी थेट लढत आहे, काही ठिकाणी चुरशीची लढत आहे तर काही ठिकाणी एकतर्फी मुकाबला होताना दिसत आहेत. पण देशाचं लक्ष मात्र, महाराष्ट्रातील एका जागेकडे लागलं आहे. तो मतदारसंघ म्हणजे बारामती. बारामतीत एकाच कुटुंबात लढत होणार आहे. ते कुटुंब म्हणजे पवार कुटुंब. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि सून सुनेत्रा पवार यांच्यात मुकाबला होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार यांनी आपलं बळ लेकीच्या पारड्यात टाकलं आहे. तर अजित पवार यांनी पत्नीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्यास दावा कायम राहावा म्हणून अजित पवार यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज छाननीत अजित दादांचाच अर्ज बाद झाला आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांच्यासोबत अजित पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजित पवार यांनी डमी उमेदवारी अर्ज भरला होता. अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर पक्षाकडून उमेदवार असावा म्हणून डमी अर्ज भरण्याची परंपरा आहे. त्यानुसार अजितदादांनीही डमी अर्ज भरला होता. मात्र, अर्ज छाननीत अजित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे. तर सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर

दरम्यान, सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर शरद पवार गटाकडून डमी अर्ज भरलेल्या सचिन दोडकेचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. दोडके यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाने आज अर्ज छाननीसाठी अनेकांना बोलावलं होतं. एकाच पक्षाचे दोन अर्ज असल्यामुळे एकाच उमेदवाराचा अर्ज मंजूर करण्यात आला. तर डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांचा अर्ज वैध ठरल्याने आता दोन्ही नणंद-भावजयांमध्ये थेट लढत होणार आहे.

शरद पवार रिंगणात

दरम्यान, ‘बघतोय रिक्षावाला’ संघटना पुरस्कृत उभे असलेले अपक्ष उमेदवार, रिक्षाचालक शरद राम पवार यांचा बारामती लोकसभेसाठीचा अर्ज मंजूर झाला आहे. सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे हा अर्ज वैध झाला असून प्रशासनाकडून मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीत पवार घराण्यात निवडणूक होत असतानाच शरद पवार नावाचा व्यक्ती मैदानात उतरल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे.

वंचितचा सुळे यांना पाठिंबा

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने या पूर्वीच सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या निवडणुकीत वंचितने या मतदारसंघातून 50 हजाराच्या वर मते घेतली होती. त्यामुळे या मतांचा सुप्रिया सुळे यांना फायदाच होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मतदान कधी ?

बारामती लोकसभा मतदरासंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या 7 मे रोजी हे मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी बारामतीसह 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. तर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.