महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे… भाजप नेत्याची घणाघाती टीका
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या जोरदार वाक् युद्ध रंगले आहे. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यामुळेच ते काहीही आरोप करत आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाणार असं मी कधीच बोललो नव्हतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या जोरदार वाक् युद्ध रंगले आहे. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यामुळेच ते काहीही आरोप करत आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाणार असं मी कधीच बोललो नव्हतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस जरा जनाची नाही तर मनाची तरी बाळगा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हल्ला चढवला. मात्र उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेली टीका भाजप नेत्यांना रुचलेली नसून आता पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला केला. देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून दिल्ली जाण्याचा शब्द दिला होता. मात्र तो शब्द पाळला गेला नाही, असा दावा उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत केला. त्याला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. आधी देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावत उद्धव ठाकरेंवर टीका केली तर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता अशी टीका बावनकुळे यांनी केली. पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले, १०० कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला, कोविडमध्ये लोक मरत असताना घोटाळे केले, मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला, याला कोडगेपणा म्हणतात असा हल्लाही बावनकुळे यांनी चढवला. देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं, मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं याला कोडगेपणा म्हणतात. लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आणि वाट्टेल ते बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला त्यानं फरक पडणार नाही पण येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की, असे टीकास्त्र बावनकुळे यांनी सोडले.
त्यांना वेड लागलं असेल…; देवेंद्र फडणवीस यांनीही दिलं जोरदार प्रत्युत्तर
एका मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला आपल्याला एक शब्द दिला होता, असा दावा केला. 2019 ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीला जाईल, असा शब्द देवेंद फडणवीस यांनी मला दिला होता, असं दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
आज ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की मी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करेल आणि मी दिल्लीला जाईल. त्यांना वेड लागलं असेल मला तर नाही ना… माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता. अमित शाहांनी त्यांना कोणत्या तरी खोलीत नेऊन तुम्हाला मुख्यमंत्री करतो असं सांगितलं. हा त्यांचा कालपर्यंतचा भ्रम होता. आता त्यांचा भ्रम बदलला. आता म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो, असं फडणवीस यांनी म्हटलं.