INDIA Alliance press conference : नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाहीत – उद्धव ठाकरे कडाडले
लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज संपणार असून सोमवारी मतदान होणार आहे. शुक्रवारी मविआची रॅली झाल्यानंतर आज , शनिवारी सकाळी मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद शनिवारी झाली. या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, रमेश चेन्नीथला, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, उद्धव ठाकरे , संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
आमच्याकडे (पंतप्रधानपदासाठी) चेहरा कोण हा प्रश्नच नाहीये, प्रश्न आहे तो भाजपचा, कारण त्यांच्याकडे एकच चेहरा आहे आणि तोही आता चालत नाहीये. भाजप काहीही म्हणू दे, भाजप आणि नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाहीत अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली. इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपद हे फिरता चषक असेल अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान केली होती. त्यालाच उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहेत.अशा वेळेस इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावर काही सहमती आहे का ? पुरेसं संख्याबळ बनलं तर राहुल गांधी हे या सरकारचं नेतृत्व करतील का, तुमची तशी इच्छा आहे का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.
लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज संपणार असून सोमवारी मतदान होणार आहे. शुक्रवारी मविआची रॅली झाल्यानंतर आज , शनिवारी सकाळी मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद शनिवारी झाली. या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, रमेश चेन्नीथला, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, उद्धव ठाकरे , संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मोदींवर कडाडून टीका केली.
इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे
देशातली लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी केली आहे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत, आम्ही वर्षाला एक पंतप्रधान करू शकतो, असं पंतप्रधान ( नरेंद्र मोदी) म्हणतात. याचा अर्थ असा की त्यांनी मान्य केलं आहे की त्यांचं सरकार काही आता येत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
एकच प्रॉडक्ट किती वेळा लाँच करायचं ?
आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत, त्याबद्दल काय करायचं हे आमच्या बैठकीमध्ये ठरलं आहे. पहिले त्यांना (विरोधक) अंगावर यायचं तेवढं येऊ द्या . त्यांच्याकडे आता चेहरा नाही. विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले होते की एकच प्रॉडक्ट किती वेळा लाँच करायचं ? हाच सवाल आता त्यांना लागू होतो.
प्रत्येक वेळेला निवडणूक आली की हे बोहल्यावर चढतात. 2014 साली , 2019 साली आणि आता 2024 साली ते बोहल्यावर चढले. आणि आता त्यांचा चेहरा चालत नाही. मोदी लाट आज कुठेही नाही. आणि भाजपची पंचाईत अशी झाली आहे की, निवडणूक आता अंतिम टप्प्यात आल्यावर ते पंतप्रधान पदाचा चेहरा बदलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे हरण्याशिवाय दुसरा पर्या नाही, असे म्हणत भाजपचा पराभव निश्चित आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.