कोरोनामुळे लोककलावंतांचे हाल, नाशिकमधील शाहीरावर भाजीपाला विक्रीची वेळ!
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लोककलावंत शाहीर मधुकर जाधव यांच्यावर अक्षरशः भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे
नाशिक : जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोनाने अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी या काळात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. इतर वर्गांप्रमाणेच लोककलावंतांना देखील कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव (Pimpalgaon) बसवंत येथील लोककलावंत शाहीर मधूकर जाधव (Lokshahir Madhukar Jadhav) यांच्यावर अक्षरशः भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. (Lokshahir Madhukar Jadhav from pimplgaon selling vegetables to run family due to corona)
कोरोनाचा प्रार्दुभाव आणि त्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाऊनने बहुत्वांशी सर्वच क्षेत्रातील अनेकांचे रोजगार हिरावले गेले. लोककलावंतांवरही कोरोनाने पोटापाण्यासाठी वेगळा पर्याय निवडण्याची वेळ आणली. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लोककलावंत शाहीर मधूकर जाधव यांनाही चरितार्थासाठी वेगळा पर्याय निवडावा लागला.
बायकोच्या गळ्यातील डोरलं मोडून मधूकर जाधव (Lokshahir Madhukar Jadhav) यांनी भाजीपाला व्यवसाय उभा केला. यातून मिळणार्या पैशातून ते कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. शासनाने लोककलावंतांची दखल घेवून लोककलावंतांच्या हितासाठी काहीतरी उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. (Lokshahir Madhukar Jadhav from pimplgaon selling vegetables to run family due to corona)
लोकशाहीर मधूकर जाधव यांनी लहानपणापासून तमाशातून काम करायला सुरुवात केली होती. त्यात त्यांचे बस्तान बसतच होते की, दुष्काळाचा सामना त्यांना करावा लागला. या दुष्काळाच्या दरम्यान ते कामाच्या शोधात पिंपळगाव (Pimpalgaon) बसवंतला येऊन स्थायिक झाले. हमालीची कामे करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी जरी त्यांनी हा मार्ग निवडला असला, तरी लोककलेप्रती त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. काहीकाळाने त्यांनी पुन्हा जागरण, गोंधळातून काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, कोरोनामुळे पुन्हा त्यांना लोककलेपासून दूर जावे लागले आहे.
कोरोनामुळे जागरण, गोंधळ बंद आहेत. या सगळ्यात परिस्थितीत संसार गाडा कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. मात्र अशाही परिस्थितीत खचून न जाता त्यांनी धाडसी निर्णय घेत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पत्नीचे दागिने मोडून त्यादोघांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला आहे. लोकसंगीत गाणारा हा आवाज आज भाजी विकण्यासाठी वापरला जातो आहे. मात्र, हेही दिवस जातील अशी आशा मनी बाळगून, मधूकर जाधव (Lokshahir Madhukar Jadhav) आणि त्यांची पत्नी सुमन जाधव आपला संसारगाडा रेटत आहेत.
(Lokshahir Madhukar Jadhav from pimplgaon selling vegetables to run family due to corona)