पनवेल : बस सेवा बंदचा प्रवाशांना फटका; खासगी वाहतूकदारांकडून भाड्याची दुपटीने वसुली

गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा ठप्प असून, सामान्य प्रवाशांचे हाल सुरू आहेत. काही अत्यावश्यक कामासाठी बाहेरगावी जायचे झाल्यास खासगी वाहतूकदारांकडून चक्क दुपटीने भाडे वसूल करण्यात येत आहे.

पनवेल : बस सेवा बंदचा प्रवाशांना फटका; खासगी वाहतूकदारांकडून भाड्याची दुपटीने वसुली
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 6:34 PM

पनवेल : गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा ( ST workers) संप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी (st) सेवा ठप्प असून, सामान्य प्रवाशांचे (passengers) हाल सुरू आहेत. काही अत्यावश्यक कामासाठी बाहेरगावी जायचे झाल्यास खासगी वाहतूकदारांकडून चक्क दुपटीने भाडे वसूल करण्यात येत आहे. याचा मोठा फटका हा सर्वसामान्य जनतेला बसत आहे. पनवेलमध्ये देखील असेच चित्र पहायला मिळत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे पनवेल डेपो बंद आहे. बस सेवा ठप्प असल्यामुळे प्रवाशांना बाहेरगावी जाण्यासाठी साखगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र खासगी वाहन व्यवसायिकांकडून प्रवाशांची अडवणूक होत असून, महाड व ग्रामीण भागात जाण्यासाठी मराठी माणून असेल तर त्याच्याकडून 300 रुपयांपर्यत भाडे आकारले जाते, तर परप्रांतीय प्रवांशाकडून चक्क चारशे ते साडेचारशे रुपयांपर्यंत भाडे वसूल करण्यात येत आहे. याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसत असून, याला कुठेतरी आळा घालण्यात यावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

अडीच महिन्यांपासून सेवा ठप्प

आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. अद्यापही या संपावर तोडगा निघाला नसल्याने अनेक एसटी कर्मचारी हे सेवेवर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे अनेक अगारातील बस सेवा ठप्प आहे. याचाच फायदा आता खासगी वाहतूकदार घेताना दिसत आहेत. पनवेलमधून महाड किंवा ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी खासगी वाहनचालक चक्क प्रति प्रवाशी 300 रुपये एवढे भाडे आकारत आहेत. तर परंप्रातींय प्रवाशांकडून चारशे ते साडेचारशे रुपये आकारण्यात येतात. प्रवाशांना देखील दुसरा कोणताच पर्याय नसल्याने अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत.

काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामध्ये विलिनिकरण ही त्यांची मुख्य मागणी आहे. सोबतच वेतन वाढीसह घरभाडे आणि महागाई भत्ता वाढीची मागणी देखील त्यांनी केली आहे. यातील त्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील काही कर्मचारी हे अद्यापही विलिनिकरणावर अडून बसले आहेत. आता जे कर्मचारी कामावर रूजू झालेले नाहीत त्यांच्यावर प्रशासनाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येत  आहे.

संबंधित बातम्या

‘कोणाला टाकून पैसे जमा करू लागले तुम्ही’ Viral झालेल्या Call Recordingमधील पोलिसांचं संपूर्ण संभाषण

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही गांधी विचाराने चालेल, कोल्हेंबाबत पटोलेंची भूमिका काय?

VIDEO: खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती: संजय राऊत

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.